06/09/2025
आज भाद्रपद शुक्ल चतुर्दशी (६सप्टेंबर) अर्थात अनंत चतुर्दशी...
पुराणानुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी विश्वाच्या निर्मितीसाठी १४ लोकांची निर्मिती केली. हे १४ लोक म्हणजे तल, अतल, वितल, सुतल, सलातल, रसातल, पाताल, पृथ्वी, भव:, स्व:, जन, तप, सत्य, मह आहेत. भगवान विष्णूंनी जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूप धारण केले. या दिवशी अनंताचे व्रत केले जाते. विधिवत हे व्रत केल्याने व्यक्तीची सर्व दुःखे दूर होतात, प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे.
या दिवसाचे आणखी एक महत्त्व म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन या दिवशी केले जाते. महाराष्ट्राप्रमाणे अनेक राज्यांत प्रथेप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही घरगुती, तर बहुतांश सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन होते. बुद्धिदेवता, विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विधिवत विसर्जन केल्यास वर्षभर घरात समृद्धी राहते, असे मानले जाते.
आपणही श्री गजाननाला भावपूर्ण निरोप देऊ या. सर्वांवर कृपा राहू दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना...
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या....
#श्रीगणेश #अनंतचतुर्दशी #गणेशविसर्जन #बाप्पामोरया #पुढच्या_वर्षी_लवकर_या