14/09/2024
आनंदच्या राजाला निरोप..
आनंद शैक्षणिक संस्था समूहाच्या सात दिवसीय गणरायाला आज निरोप देण्यात आला. मागील सात दिवस आनंद ग्रुपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम, कवितांची मैफील, नाटकांचे प्रयोग व विविध खेळ घेण्यात आले. आनंद शैक्षणिक संस्था समूहाचे संस्थापक संचालक डाॅ. अमोल अन्नदाते यांच्या हस्ते विधिवत पूजा - आरती करुन गणरायाला निरोप देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सुंदर लेझीम नृत्य सादर केले. यावेळी डाॅ. अमोल अन्नदाते यांच्यासह डाॅ. अभिजित अन्नदाते, डाॅ. प्रविणा अन्नदाते, आनंद आयुर्वेद काॅलेजच्या प्राचार्या डाॅ. स्मिता काळोगे, होमेओपॅशी काॅलेजच्या प्राचार्या डाॅ. जया खरात, नर्सिंग काॅलेजच्या प्राचार्या डाॅ. ज्योती मॅम, सागर ठोंबरे सर, इतर शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.