Piyush Pashupakshi Services

Piyush Pashupakshi Services Animal health

For sale...
26/02/2017

For sale...

17/11/2016

1) 15 दिवसांच्या करडांपासून ते 6 महीन्याच्या करकरडांपयॆत जाती नुसार, वयानुसार तसेच नर / मादी यांची वेगवेगळी राहण्याची व्यवस्था करण्यास अत्यंत उपयुक्त.
2) सोबत गव्हाण असल्याने लहान करडांना एकत्रितपणे खाण्यापिण्याची सवय लागते. तसेच चारा वाया जात नाही.
3) जमिनीजमिनीपासून उंचीवर असल्याने लेंडी व मुत्र खाली पडल्याने गोठ्यात स्वच्छता राहण्यास मदत होते.
4) लहान करडांची अशा प्रकारे स्वतंत्र व्यवस्था असल्याने ते आजारपणाला कमी प्रमाणात बळी पडतात त्यामुळे करडांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होते.
5) कमीत कमी जागेत तसेच वजन कमी असल्याने आपल्या सोयीनुसार गोठयाची जागा बदलता येते.
6) करडांना झाडपाला, शेवरी, तुती, सुबाभूळ, दशरथ घास, मेथी घास अशा प्रकारचा चारा दोरीच्या साह्याने आतल्या बाजूला ठेवून खाण्यासाठी देवू शकतो.
7) करडांची अशा प्रकारे स्वतंत्र व्यवस्था असल्याने वाढ झपाट्याने होते.
8) खासकरून करडांचा विचार करून एका शेळीच्या किंमतीत दहा ते बारा करडांची अत्यावश्यक सोयीनुसार टिकाऊ बाभळीच्या लाकडी पट्टया वापरून कमीत कमी किमतीत अत्याधुनिक गोठा बनविण्यात आलेला आहे.
9) वाहतूक करण्यास अत्यंत उपयुक्त व सोपे.
10) पाऊस, ऊन,वारा, थंडी तसेच मोठय़ा जनावरांपासून संरक्षण होते.

13/01/2016
13/01/2016

शेळीपालनासाठी कोणत्या जाती निवडाव्यात?
उस्मानाबादी शेळी मांस उत्पादनासाठी, तर संगमनेरी शेळी दूध आणि मांसासाठी चांगली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे.
ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे 25 किलो आणि मादीचे 21 किलो वजन भरते. करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन 14 ते 15 किलो असते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी 50 किलो, तर शेळीचे वजन 32 किलोंपर्यंत भरते. ही शेळी 11 व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17 व्या महिन्यात पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण 40 टक्के आहे. दोन वेतांतील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. प्रत्येक वेतामध्ये साठ लिटर दूध देते. दुधाचा कालावधी 97 दिवसांचा आहे. भाकड काळ हा 84 दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.
दूध उत्पादनासाठी शेळी निवडताना : शेळ्यांचे डोळे पाणीदार व तेजस्वी असावेत. छाती रुंद, भरदार असावी व मान लांब व उंच असावी. कास मोठी, दोन्ही सडांची लांबी सारखी असावी. कास दोन्ही पायांच्या मध्ये किंचित मागच्या बाजूला उंचावलेली असावी.
मांस उत्पादनासाठी उस्मानाबादी शेळ्या निवडताना : सरासरी वजनापेक्षा (35 ते 40 कि. ग्रॅ.) थोडे जास्त वजन असणाऱ्या शेळ्या निवडाव्यात. या शेळ्यांचे पाय सरळ, मजबूत व दोन पायांत भरपूर अंतर असावे. पाठ सरळ व रुंद असावी. छाती भरदार व रुंद असावी.
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

Address

Vaijapur
423701

Telephone

9970256848

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Piyush Pashupakshi Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram