04/05/2026
“मिमिक्री ,स्किट आणि विडंबन नाट्य या स्पर्धेचा बक्षीस समारंभ “
साई आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, सासुरे-वैराग सोलापूर येथे आयोजित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या राज्यस्तरीय युवा महोत्सव “स्पंदन २०२६(नाट्यकला)”अंतर्गत ३२ महाविद्यालयाच्या ३२ एकांकिका तसेच एकूण ६५ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ४४ स्किट,२७ विडंबन नाट्य तसेच १६ विद्यार्थ्यांनी मिमिक्री या प्रकारात सहभाग नोंदवला.
महाराष्ट्रआरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक
या महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मीरा सूर्यवंशी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे विद्यार्थी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, श्री. त्र्यंबक ढेंगळे-पाटील साहेब , प्राचार्य डॉ.साहेबराव गायकवाड,चारही परीक्षक तसेच श्री. शाम गोवर्धन, डॉ. दत्तात्रय पिसाळ व डॉ. अशोक अनपट तसेच विद्यापीठ प्रतिनिधी अभिनेते श्री.योगेश आरोटे,श्री.अर्जुन नागलोत,श्री.घनश्याम धनगर यांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेचे परीक्षण अनुभवी परीक्षकांनी केले. श्री.मुकुंद मधुकर हिंगणे (वरिष्ठ पत्रकार व रंगकर्मी) आणि अॅडव्होकेट सारिका अग्निहोत्री यांनी एकांकिका स्पर्धेचे परीक्षण केले. डॉ. रविराज गायकवाड यांनी स्किट स्पर्धेचे तर आंबादास कनकट्टी (चार्ली) यांनी विडंबन नाट्य व मिमिक्री प्रकारांचे परीक्षण केले.
परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभिनय, दिग्दर्शन व सर्जनशीलतेचे विशेष कौतुक केले. स्पर्धेमध्ये विविध ६५ महाविद्यालयांमधील ८५० वैद्यकीय च्या सर्व शाखांच्या (वैद्यकीय/आयुर्वेद/होमिओपॅथी/डेंटल/फिजियोथेरपी/नर्सिंग) विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
स्पंदन २०२६ या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तम व्यासपीठ मिळाल्याचे मत संचालक डॉ.देवंद्र पाटील यांनी व्यक्त केले.