ℝ𝕒𝕛𝕖𝕟𝕕𝕣𝕒 ℂ𝕠𝕟𝕤𝕦𝕝𝕥𝕒𝕟𝕔𝕪

  • Home
  • India
  • Vasai
  • ℝ𝕒𝕛𝕖𝕟𝕕𝕣𝕒 ℂ𝕠𝕟𝕤𝕦𝕝𝕥𝕒𝕟𝕔𝕪

ℝ𝕒𝕛𝕖𝕟𝕕𝕣𝕒 ℂ𝕠𝕟𝕤𝕦𝕝𝕥𝕒𝕟𝕔𝕪 Consultant
Health Industry

Operation, Surgery financial Advisor
Govt Health Scheme Advisor
Medica Official Account Of RugnMitra

"खिचडी घर" उपक्रमाचा तिसरा दिवस आजपासून सुरू होत आहे.या उपक्रमामध्ये आतापर्यंत सहभागी झालेल्या सर्व दानशूर आणि स्वयंसेवक...
09/07/2025

"खिचडी घर" उपक्रमाचा तिसरा दिवस आजपासून सुरू होत आहे.
या उपक्रमामध्ये आतापर्यंत सहभागी झालेल्या सर्व दानशूर आणि स्वयंसेवक मित्र मंडळींचे मन:पूर्वक आभार! 💛

💫 जर अजूनही कुणाला सेवा भावनेतून स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायचं असेल,
तर कृपया Share and Care Charitable Trust टीमशी संपर्क साधा.

📞 +91 900 4477 660 / +91 977 356 8063
📍 Tata Memorial Hospital Or KEM Hospital परिसर, सायं. ५.३०-६ वाजता

*"आपल्या सहभागातून गरजवंतासाठी जगण्याला नवा उत्साह मिळू शकतो!"* 🌿

धन्यवाद!
*– Share and Care Charitable Trust*

मी केलेल्या सूचनेला उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख, विशेष कार्यकारी अधिकारी श्री मंगेश चिवटे साहेब यांनी सकार...
04/04/2025

मी केलेल्या सूचनेला उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख, विशेष कार्यकारी अधिकारी श्री मंगेश चिवटे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी शासनाला दरपत्रक ठरविण्याबाबत सूचना केल्या आहेत, लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

Rajendra Dhage 8010795101
आमची वसई 𝚁𝚞𝚐𝚗𝚊𝙼𝚒𝚝𝚛𝚊
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारच्या महत्वकांक्षी योजना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन-अधिकृत 𝚁𝚞𝚐𝚗𝚊𝙼𝚒𝚝𝚛𝚊

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणानंतर एकंदरीत समोर आलेल्या गोष्टी 👇🏽👉🏽 धर्मादाय नियम अंतर्गत उपचार करण्यास धर्मादाय रुग्ण...
04/04/2025

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणानंतर एकंदरीत समोर आलेल्या गोष्टी 👇🏽

👉🏽 धर्मादाय नियम अंतर्गत उपचार करण्यास धर्मादाय रुग्णालये टाळाटाळ करतात.
👉🏽 धर्मादाय आयुक्त यांचे धर्मादाय रुग्णालयांवर तसूभरही नियंत्रण नाही. धर्मादाय समितींच्या कामाचा आढावा घेणे गरजेचे आहे!
👉🏽 Pre Mattuare Baby च्या उपचारांसाठी शासनाची कुठलीही पर्यायी योजना नसल्याने अशा बालकांच्या आरोग्यासाठी होणाऱ्या खर्चासाठी पालकांना वणवण भटकावे लागते. (शासनाचे बालमृत्यू रोखण्याचे धोरण असून पण शासन अशा समस्येवर काम करत नाही)
👉🏽 खासगी / धर्मादाय रुग्णालये यांच्या दरपत्रकांवर सरकारने नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी विशिष्ठ समिती स्थापन करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अशा समितीमध्ये रुग्णमित्रांचा (रुग्णांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा) समावेश व्हावा.

Rajendra Dhage 8010795101
आमची वसई रुग्णमित्र

*(टाटा ट्रस्ट) TATA TRUST* *_टाटा ट्रस्टची वैद्यकीय अनुदानाबाबत कार्यपद्धती व सूचना._*१) वैद्यकीय अनुदानासाठी अर्ज रुग्ण...
01/04/2025

*(टाटा ट्रस्ट) TATA TRUST* *_टाटा ट्रस्टची वैद्यकीय अनुदानाबाबत कार्यपद्धती व सूचना._*

१) वैद्यकीय अनुदानासाठी अर्ज रुग्णाने किंवा रुग्णाच्या जवळच्या व्यक्तीने / मुलगा / मुलगी / बहीण / भाऊ यांनी सादर करावेत. कुटुंबातील सदस्य (वडील/आई/पती/पत्नी)

२) रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर प्राप्त झालेला अर्ज/वैद्यकीय अर्ज ट्रस्टकडून स्वीकारला जाणार नाही.

३) वैद्यकीय अनुदान देण्याचा किंवा अन्यथा ट्रस्टचा निर्णय अर्जदाराला कळवला जाईल. अर्ज नाकारल्यास कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाही.

४) विनंती केल्यावर रुग्णालयाकडून मूळ बिले /पावत्या सादर कराव्यात. रुग्णालयाकडून डुप्लिकेट बिले / पावत्या / प्रमाणपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.

५) नाकारलेल्या प्रकरणांसाठी, मूळ बिले परत केली जातील; तथापि, इतर कागदपत्रे ट्रस्टकडे ठेवली जातील.

६) अपूर्ण अर्ज नाकारले जातील आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जात नाही.

७) अर्जदार वैद्यकीय अर्ज फॉर्म मुल्ला हाऊस येथील ट्रस्टच्या कार्यालयात (आठवड्याच्या दिवशी दुपारी २:३० ते ४:०० दरम्यान) वैयक्तिकरित्या सादर करू

शकतात किंवा पोस्टाने किंवा igpmed@tatatrusts.org वर ईमेलद्वारे पाठवू शकतात.

८) विश्वस्तांना दिशाभूल करण्याच्या उद्देशाने अपूर्ण / फेरफार केलेले / खोटे माहिती असलेले अर्ज रद्दबातल मानले जातील आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

*आवश्यक कागदपत्र*

१) अर्जदार आणि रुग्णाचा फोटो ओळखीचा पुरावा (खालील यादीतील कोणताही एक)

अ) पॅन कार्ड ब) आधार कार्ड क) मतदार ओळखपत्र

२) पत्त्याचा पुरावा (सध्याचा किंवा कायमचा पत्ता) (खालील यादीतील कोणताही एक)

अ) रेशन कार्ड ब) आधार कार्ड क) मतदार ओळखपत्र

३) सर्व कमाई करणाऱ्या सदस्यांचा नवीनतम उत्पन्नाचा पुरावा

अ) पगारदार असल्यास नवीनतम आयकर विवरणपत्र / नवीनतम पगार स्लिप / उत्पन्न प्रमाणपत्र

ब) पेन्शनधारक असल्यास गेल्या एक वर्षाच्या नोंदी असलेले पेन्शन पासबुक

क) असंघटित क्षेत्रात नोकरी करत असल्यास स्वयंघोषित उत्पन्नाचा पुरावा

४) सर्व कमाई करणाऱ्या सदस्यांचे नियोक्त्याकडून पत्र ज्यामध्ये रुग्ण कुटुंबासाठी कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय मदतीसाठी पात्र आहे की नाही हे

नमूद केले आहे. जर नसेल, तर नियोक्त्याकडून त्या संदर्भात एक पत्र.

*महत्वाची सुचना-*
१) रुग्णाच्या बैंक खात्यातून किंवा अर्जदाराच्या बैंक खात्यातून रद्द केलेला धनादेश (अर्जदाराच्या बँक खात्यातून धनादेश फक्त रुग्ण अल्पवयीन असतानाच स्वीकारला जातो).

२) जर रुग्णाला रुग्णालयातून डिस्वार्ज देण्यात आला असेल, तर कृपया डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसह खरेदी केलेल्या औषधांच्या डिस्चार्ज कार्ड/ सारांश, अंतरिम बिल, मूळ अंतिम बिल, ठेव पावत्या,

अंतिम सेटलमेंट पावती आणि रोख मेमोची छायाप्रत जोडा.

३) किडनी प्रत्यारोपणाच्या प्रकरणांमध्ये, रुग्णालयाच्या अधिकृतता समितीकडून एनओसी पत्र सादर करावे लागेल.

४) जर उपचार चालू असतील किंवा अद्याप सुरु झालेले नसतील, तर कृपया उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची एक प्रत जोडा ज्यामध्ये आजार, सांगितलेला उपचार आणि उपचाराच्या अंदाजे खांचा तपशील असेल.

५) जर चेक आणि क्रेडिट/डेबिट कार्डने पेमेंट केले असेल, तर कृपया व्यबहार दर्शविणाऱ्या बैंक पासबुक / स्टेटमेंटची प्रत सादर करा.

६) अर्ज केलेल्या, मंजूर केलेल्या आणि मिळालेल्या अनुदानांची वैयक्तिक देणगीदारांची आणि ट्रस्टची यादी जोडा.

*वैद्यकीय अनुदानासाठी अर्ज www.tatatrusts.org वर उपलब्ध आहे*

*महत्त्वाची सूचना : रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट स्वतः अर्ज करावा.(कोणत्याही मध्यस्थांच्या मार्फत अर्ज करू नये तसेच यासाठी कुठलीही खाजगी व्यक्ती किंवा संस्थेसोबत आर्थिक देवाण-घेवाण करू नये.)*

*राजेंद्र ढगे 8010795101*
*आमची वसई रुग्णमित्र*
*Rajendra Consultancy*

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोस्ट शेअर करा रुग्णमित्र पेज लाईक शेअर फॉलो करा!

*श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी, मुंबई.**_पडताळणी समितीने निर्धारित केलेले वैद्यकीय अनुदानाचे निकष._**अर्...
01/04/2025

*श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास प्रभादेवी, मुंबई.*

*_पडताळणी समितीने निर्धारित केलेले वैद्यकीय अनुदानाचे निकष._*

*अर्ज कसा करावा?*

*अर्ज*

अ) अर्जासोबत न्यासाकडून पुरविण्यात येणाऱ्या विहित नमुन्यात माहिती भरून द्यावी.

ब) रुग्णाने किंवा त्याच्या वतीने नजीकच्या नातेवाईकाने यांनी अर्ज सादर करावा.

क) येताना स्वतःचे ओळखपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व शिधा शिधापत्रिकाची मूळ प्रती दाखविण्यासाठी आणणे गरजेजे आहे.

*वैद्यकीय प्रमाणपत्र*,

वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र सरकारी अथवा निमसरकारी रुग्णालयाचे असावे. प्रमाणपत्र खाजगी रुग्णालयाचे असल्यास उपचार, शस्त्रक्रिया वैगेरे सरकारी अथवा निमसरकारी रुग्णालयातून घेण्याऐवजी खाजगी रुग्णालयातून कस्वून घेण्याची विश्वासार्ह व समर्थनीय कारणे अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची सही, शिक्का व रुग्णालयाचा शिक्का तसेच शस्त्रक्रियेची तारीख अथवा उपचार घ्यावयाचा असल्यास उपचाराचा कालावधी नमूद करणे आवश्यक आहे. रुग्णालयाच्या प्रमाणपत्रावर रुग्णाचा केस पेपर क्र. नमूद करावा.

*उत्पन्नाचा दाखला*

अ) अर्जदाराच्या उत्पन्नाचा दाखला (नोकरी असल्यास कंपनीच्या स्टॅम्प सहीसह पगाराची पावती)

ब) नोकरी व्यतिरिक्त इतर स्वतंत्र व्यवसाय, शेती, मोलमजुरी इ. उत्पन्नाचे साधन असल्यास त्याविषयीचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

*हमी पत्र*

अ) रुग्ण ज्यांच्यावर अवलंबून आहेत असे त्यांचे नातेवाईक सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, राष्ट्रीयकृत बँक किंवा खाजगी कंपनीत नोकरीला असल्यास कार्यालयाकडून वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे किंवा कसे? याचे प्रमाणपत्र अधिकाऱ्यांनी स्वाक्षरीत केलेले असावे.
ब) अक्षम अधिकाऱ्यांचे नाव व दूरध्वनी क्रमांक स्पष्ट नमूद असावा.

५) महाराष्ट्रातील कायम रहिवासी दाखला.
अ) शिधापत्रिका (रेशनकार्ड) अथवा तलाठी किंवा तहसीलदार यांना रहिवाशी दाखला अर्जासोबत जोडावा.

*न्यासाकडून खालील आजारांवर मदत केली जाते.*
१) हृदय शस्त्रक्रिया.
२) मेंदूच्या शस्त्रक्रिया.
३) मूत्रपिंड प्रत्यारोपण.
४) डायलेसिस.
५) हेपेटायसिस सी.
६) खुबा प्रत्यारोपण.
७) गुडघा प्रत्यारोपण.
८) लिव्हरचे प्रत्यारोपण.
९) मज्जातंतू शस्त्रक्रिया.
१०) कॉकलर इम्प्लांट शस्त्रक्रिया,
११) कर्करोग.

अपघात (अपघातासाठी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्यास न्यासाकडे अर्ज करता येतो, हॉस्पिटलचे प्रमाणपत्र आणि पोलिसांचा पंचनामा जोडावा.

*महत्वाची सुचना-*

▶ अर्थसहाय्याचा धनादेश हॉस्पिटलच्या नावाने येतो. धनादेश मिळण्यास २० ते २५ दिवसांचा कालावधी लागू शकतो.

▶ अर्जदाराची दिलेली माहिती चुकीची आढळ्यास अर्ज नाकारला जातो.

*महत्त्वाची सूचना : रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट स्वतः अर्ज करावा. (कोणत्याही मध्यस्थांच्या मार्फत अर्ज करू नये तसेच यासाठी कुठलीही खाजगी व्यक्ती किंवा संस्थेसोबत आर्थिक देवाण-घेवाण करू नये.)*

*राजेंद्र ढगे 8010795101*
*आमची वसई रुग्णमित्र*
*Rajendra Consultancy*

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोस्ट शेअर करा रुग्णमित्र पेज लाईक शेअर फॉलो करा!

*मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबतची कार्यपद्धती**आरोग्यासाठीच्या शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्य...
01/04/2025

*मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबतची कार्यपद्धती*

*आरोग्यासाठीच्या शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अर्ज करण्यापूर्वी खालीलप्रमाणे प्राधान्याने कार्यवाही करावी :-*

*मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून खालील आजारांवर मदत मिळते :-*

१) कॉकलियर इम्प्लांट (वय वर्षे २ ते ६),
२) हृदय प्रत्यारोपण,
३) यकृत प्रत्यारोपण,
४) किडणी प्रत्यारोपण,
५) फुप्फुस प्रत्यारोपण,
६) बोन मॅरो प्रत्यारोपण,
७) हाताचे प्रत्यारोपण,
८) हिप रिप्लेसमेंट,
९) कर्करोग शत्रक्रिया,
१०) रस्ते अपघात,
११) लहान बालकांची शस्रक्रिया,
१२) मेंदुचे आजार,
१३) हृदयरोग,
१४) डायलिसिस,
१५) कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन),
१६) अस्थिबंधन,
१७) नवजात शिशुंचे आजार,
१८) गुडघ्याचे प्रत्यारोपण,
१९) बर्न रुग्ण (MLC),
२०) विद्युत अपघात रुग्ण (MLC)

*अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी.*
१. अर्ज (विहीत नमुन्यात).

२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

(खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून हॉस्पिटल खर्चाचे अंदाजपत्रक प्रमाणित करणे आवश्यक आहे.)

३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रुपये १.६० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)

४. रुग्णाचे आधार कार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक आहे.

५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे).

६. संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी FIR रिपोर्ट आवश्यकb आहे.

८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC / शासकीय समितीची मान्यता आवश्यक

▶ संपूर्ण कागदपत्रांची एक पीडीएफ बनवून खालील ई-मेल वर पाठवावी E-mail ID: aao.cmrf-mh@gov.in

▶ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची यादी वेबसाईटवर (cmrf.maharashtra.gov.com) आहे.

*महत्त्वाची सूचना : रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट स्वतः अर्ज करावा. (कोणत्याही मध्यस्थांच्या मार्फत अर्ज करू नये तसेच यासाठी कुठलीही खाजगी व्यक्ती किंवा संस्थेसोबत आर्थिक देवाण-घेवाण करू नये.)*

*राजेंद्र ढगे 8010795101*
*आमची वसई रुग्णमित्र*
*Rajendra Consultancy*

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोस्ट शेअर करा रुग्णमित्र पेज लाईक शेअर फॉलो करा!

*श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डी.*अर्जदार/रुग्णांसाठी सूचना१) अर्ज कसा करावा ?अ) अर्जदार हा रेशनकार्डमध्ये...
01/04/2025

*श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डी.*

अर्जदार/रुग्णांसाठी सूचना

१) अर्ज कसा करावा ?

अ) अर्जदार हा रेशनकार्डमध्ये असलेल्या नावांपैकी एक व्यक्ती असावा.

ब) रेशनकार्डची स्वःसाक्षांकित केलेली झेरॉक्स प्रत जोडावी.

क) रुग्णालयाच्या लेटरहेडवर खर्च, खर्चाची रक्कम अंकी व अक्षरी, शस्त्रक्रिया असेल तर शस्त्रक्रियेची तारीख / उपचार असेल तर उपचाराचा कालावधी, उपचाराचा तपशीलवार खर्च घ्यावा.

ड) सादर रुग्ण केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या जीवनदायी / महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना, तत्सम योजनेचा लाभार्थी नाही असा स्पष्ट उल्लेख असावा.

इ) रुग्णालय खर्चाच्या प्रमाणपत्रावर रुग्णालय प्रशासक यांचा सही व शिक्का, नाव, मोबाईल नंबरचा उल्लेख असावा.

२) उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र

अ) प्रतिज्ञापत्र हे रुग्ण अगर रुग्णांच्या कुटुंबातील व्यक्तीने तहसीलदार किंवा नोटरी यांच्या स्वाक्षरीने करावे. यामध्ये रेशनकार्डमधील सर्व व्यक्तींची संपूर्ण नावे, वय, नातेसंबंध, व्यवसाय, वार्षिक उत्पन्न व रुग्ण केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या जीवनदायी / महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना, तत्सम योजनेचा लाभार्थी नाही असा स्पष्ट उल्लेख असावा.

३) आवश्यक कागदपत्र

अनुदान मागणी अर्ज, रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, उत्पत्राबाबतचे प्रमाणपत्र, आधारकार्ड.

*संस्थानकडून खालील आजारांवर मदत केली जाते.*

१) कर्करोगासंबंधी उपचार, शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार..
२) रक्तासंबंधीचे आजार.
३) जी. बी. एस.
४) सर्व प्रकारचे प्रत्यारोपण, शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार.
५) कॉकलर इम्प्लांट शस्त्रक्रिया.
६) हृदय शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार.
७) मेंदूच्या शस्त्रक्रिया व नंतरचे उपचार.
८) मणका शस्त्रक्रिया

*महत्वाची सुचना-*

▶ रुग्ण केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या जीवनदायी / महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजना, तत्सम योजनेचा लाभार्थी असल्यास संस्थानमार्फत अनुदान दिले जात नाही.

▶ वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता शस्त्रक्रियेच्या तारखेपासून (१०) दहा दिवसाच्या आत करावी अन्यथा अर्ज नामंजूर होईल.

*महत्त्वाची सूचना : रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट स्वतः अर्ज करावा. (कोणत्याही मध्यस्थांच्या मार्फत अर्ज करू नये तसेच यासाठी कुठलीही खाजगी व्यक्ती किंवा संस्थेसोबत आर्थिक देवाण-घेवाण करू नये.)*

*राजेंद्र ढगे 8010795101*
*आमची वसई रुग्णमित्र*
*Rajendra Consultancy*

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोस्ट शेअर करा रुग्णमित्र पेज लाईक शेअर फॉलो करा!

*पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी / प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोष /**Prime Minister's National Relief Fund**अर्ज करताना कस...
01/04/2025

*पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी / प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोष /*

*Prime Minister's National Relief Fund*

*अर्ज करताना कसा करावा आणि सूचना*
१) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १ लाख रु. पर्यंत असावे.

२) रुग्णाचा उपचार व निदान सरकारी रुग्णालयात किंवा पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी योजना सुरु असलेल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरु असावा.

३) पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी योजना सुरु असलेल्या महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी. - https://pmnrf.gov.in/en/about/private-hospital-lists

*आवश्यक कागदपत्र*
१) पेशंट राहत असलेल्या लोकसभा मतदार संघांच्या खासदारांचे शिफारसपत्र.

२) तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.

३) १० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र. (नोटरी)

४) शपथपत्र प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोष साऊथ दिल्ली यांच्या नावे असावा. (पत्रात नाव, पत्ता, उत्पन्न, रुग्णासोबतचे नाते,

उपचारावर लागणार खर्च आणि होणारा खर्च करण्यास आपण असमर्थ आहेत असे त्यात नमूद असावे.).

५) पेशंट आणि नातेवाईकांचे आधार कार्ड व मतदान कार्डचे झेरॉक्स. (रहिवाशी पुराव्यासाठी).

६) पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीचा अर्ज.

७) रुग्णाचे २ कलर पासपोर्ट फोटो.

८) बँक पासबुकचे झेरॉक्स (स्पष्ट असावा).

९) रुग्णालयाच्या खर्चाचे अंदाजपत्रक (इस्टीमेट).

►PMNRF संपर्क https://pmnrf.gov.in/en/contact-us

► PMNRF अर्ज https://pmnrf.gov.in/en/downloads

► PMNRF सामान्य प्रश्न https://pmnrf.gov.in/en/faqs/pmnrf

*अर्ज कुठे पाठवावा किंवा जमा करावा*
१) अर्ज स्वतः रुग्ण किंवा नातेवाईक दिल्ली येथे जाऊन जमा करू शकतो.

२) अर्ज स्पीड पोस्टद्वारे पाठवता येतो

३) खासदार कार्यालयातून देखील अर्ज पुढे पाठवता येतो.

*महत्त्वाची सूचना : रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट स्वतः अर्ज करावा. (कोणत्याही मध्यस्थांच्या मार्फत अर्ज करू नये तसेच यासाठी कुठलीही खाजगी व्यक्ती किंवा संस्थेसोबत आर्थिक देवाण-घेवाण करू नये.)*

*राजेंद्र ढगे 8010795101*
*आमची वसई रुग्णमित्र*
*Rajendra Consultancy*

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोस्ट शेअर करा, रुग्णमित्र पेज लाईक शेअर फॉलो करा!

LET'S JOIN HAND TOGETHER FOR HASSLEFREE REDEVELOPMENTYou develop your propertyBe the architect of your own property deve...
28/03/2025

LET'S JOIN HAND TOGETHER FOR HASSLEFREE REDEVELOPMENT

You develop your property

Be the architect of your own property development, contact us today.

8010795101
Rajendra Consultancy

18/03/2025

हॉस्पीटल मध्ये House Keeping Staff हवा आहे.

8237945378
Ref रुग्णमित्र राजेंद्र ढगे

मला लोक बोलता तुम्ही सरकारी रुग्णालयांचा पर्याय का देत नाहीत गरजू रुग्णांना? सरकारी रुग्णालयात मोफतचे उपचार मिळत असताना ...
22/02/2025

मला लोक बोलता तुम्ही सरकारी रुग्णालयांचा पर्याय का देत नाहीत गरजू रुग्णांना? सरकारी रुग्णालयात मोफतचे उपचार मिळत असताना तुम्ही माफक दरात उपचारासाठी का आग्रह धरतात??

त्यांच्यासाठी 👇🏽 पोस्ट....

बाबांनो तुमचं रुग्ण मी माझ्या घरातील सदस्य आहे अस समजून तुम्हाला मार्गदर्शन करतो, सरकारी रुग्णालयांची अवस्था मी जवळून पाहत आहे. तुमच्या कितीही ओळखी असू देत पण वेळेला ती ओळख कामी येत नाही अखेर प्रत्येकाला आपली नोकरी प्यारी असते. थोडेफार खर्च आपल्या आरोग्यावर करा मी माफक दरात उत्तम उपचार देण्याची हमी देतो. सर्व चौकश्या संपल्यावरच संपर्क साधावा कारण माझा वेळ महत्त्वाचा आहे, हवे तर तुम्ही सशुल्क मार्गदर्शन घेतलेत तरी हरकत नाही.

राजेंद्र ढगे 8010795101
रुग्णमित्र - राजेंद्र कन्सल्टन्सी

Address

302/3rd Floor, Ratan Apartment, Near Papadi Post Office, Vasai Gaon, Vasai W
Vasai
401207

Telephone

+918010795101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ℝ𝕒𝕛𝕖𝕟𝕕𝕣𝕒 ℂ𝕠𝕟𝕤𝕦𝕝𝕥𝕒𝕟𝕔𝕪 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category

Our Story - IM MultiSpecialty Hospital

Modern medicine has evolved rapidly in the recent decades. At IM Multi-speciality Hospital, you receive healthcare comparable to the finest in the world. We are a multi-speciality care hospital built at par with the international standards, located in Vasai,Mumbai.

IM Multi-speciality Hospital is comparable to any top ranking hospital in the country. Equipped with 40 beds across 4 floors, we house one of the finest Cardiac Care, Gynaec Clinic, Pediatric Facility, among others.

Our approach of “ Cure, Care and Commitment..” has inspired us to bring the best aspects of modern medicine and health care under a single multi-functional premises.