10/05/2023
करिअर मार्गदर्शन आणि टेस्टिंग करताना अनेक वेगवेगळे अनुभव येत असतात. बरेचदा पालक आपल्या सुप्त इच्छा मुलांवर थोपवण्याचा प्रयत्न करतात. पण मुलांचा कल नक्की कोणत्या क्षेत्रात आहे आणि त्यांची बुद्धिमत्ता त्याला साथ देते का ? या कडे बरेचदा परस्पर दुर्लक्ष होते. ॲप्टिट्यूड टेस्ट चा रिपोर्ट सर्व चित्र स्पष्ट करतात. त्यात मुलांची आवड, बुद्धिमत्ता आणि या दोघांचे संयोजन दाखवले जाते ,त्याच बरोबर IQ ( intelligent quotient ) , EQ ( emotional quotient) , SQ ( social quotient), याची माहिती मिळते. तुमच्या पल्यात कोणत्या क्षमता चांगल्या आहेत व कोणत्या ठिकाणी सुधारणा आवश्यक आहे ते समजते.
पाल्याने कोणते क्षेत्र निवडावे किंवा कोणते क्षेत्र त्यांच्या साठी योग्य नाही याचा पडताळा करता येतो. आपले मूल आणि त्यांच्या वयाची इतर मुले यांच्यातील क्षमतांचा आढावा मिळतो. सर्वांगीण प्रगती साठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, कोणते अभ्यासक्रम करू शकता हे समजते.
बरेचदा , मुलांना काहीतरी वेगळेच करायचे असते पण पालकांच्या अपेक्षेच्या ओझ्याखली त्यांना काही बोलता येतं नाही पर्यायी मूल त्या क्षेत्रात रमत नाही वेळ, पैसा , एनर्जी सगळे वाया जाते. आणि नैराश्य येऊ लागते.
पालक खूप आशा घेऊन आलेले असतात, काही वेळा आधीच एखाद्या कोर्स ची फी भरून येतात. पण टेस्ट केली की त्यांना चित्र स्पष्ट होते . आपल्या मुलांनी पुढे जावे कोणत्या पालकांना वाटणार नाही. पण त्यासाठी आवश्यक असलेला कल आणि बुद्धिमत्ता फक्त टेस्ट करून समजते. फक्त पालकच नाही तर मुले ही हट्ट घेऊन आलेले असतात मला गेमर बनायचंय, रोबोटिक्स करायचे आहे किंवा युट्युबर बनायचंय. अशावेळी टेस्ट करून त्यांना समजते की आपल्याला ते करिअर झेपणार आहे की नाही?
करिअर मार्गदर्शन करताना, बरेच वेळा पालक ॲप्टिट्यूड टेस्ट ची विचारणा करत येतात पण येताना आपल्या आपल्या पाल्याच्या भविष्याचे आणि करिअरचे चित्र मनात रेखाटून येतात. अशावेळी पाल्याची चाचणी झाल्यानंतर रिपोर्ट अनालिसिस करताना हे समजते की त्या पाल्याचा कल दुसऱ्याच कोणत्यातरी फिल्डमध्ये आहे पण हे समजल्यानंतर बरेच वेळेला पालक ऑफबीट करिअरची वाट निवडण्यास विरोध करतात उदाहरणार्थ : Air Hostess, Bar Tender, DJ , vlogger , blogger इत्यादी. हे त्यांच्या पाल्याप्रती असलेल्या काळजीमुळे असते किंवा त्या क्षेत्राची पूर्ण माहिती नसल्यामुळे असते. पण रिपोर्ट मध्ये या सर्व बाबींचा आढावा घेता येतो आणि त्या करिअरकडे वाटचाल कशी करता येईल याची पूर्ण माहिती मिळते. असे बरेच विद्यार्थी व पालक मार्गदर्शन घेऊन त्यांच्यासाठी योग्य असलेल्या यशस्वी करिअर कडे यशस्वी वाटचाल करत आहेत.
तरी वेळेत निर्णय घेऊन टेस्ट करून घेतली की आपल्या लाखो रुपयांची बचत तर होतेच त्याच बरोबर वेळ आणि एनर्जी ही वाचते.
आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.
शेअर अँड सॉल्व कौन्सिलिंग सर्विसेस
8655457638, Shareandsolve24@gmail.com