Vibhas - Vasai-Virar Institute of Behavioral Health and Sciences

  • Home
  • India
  • Virar
  • Vibhas - Vasai-Virar Institute of Behavioral Health and Sciences

Vibhas - Vasai-Virar Institute of Behavioral Health and Sciences 44 beds exclusive psychiatric hospital and rehabilitation centre located in virar west.

14/04/2023
Happy Independence Day to all….चला मानसिक आज़ार व नशेच्या ग़ुलामीतून देश आज़ाद करण्याचा प्रयत्न करु !
15/08/2022

Happy Independence Day to all….

चला मानसिक आज़ार व नशेच्या ग़ुलामीतून देश आज़ाद करण्याचा प्रयत्न करु !

23/05/2021

*अधुरी एक कहाणी......*

डॉ सुरेश पाटिल

आज ती खूप खुश होती. देशामधील सिनेसृष्टीतील आघाडीच्या मासिकाच्या कव्हर पेजवर तिचा फोटो आला होता. अवघ्या तीन वर्षाच्या करियरमध्ये तिने तब्बल दहा सुपरहिट सिनेमे दिले होते. खूप सारा चाहता वर्ग तिच्या पाठीशी होता.
उच्च शिक्षित असून 'ईशा'ने अभिनेत्री होण्याचे ठरवले होते. तिने सुप्रसिद्ध हिरो आणि तिचा सहकलाकार 'साहिल'ला फोन केला आणि रात्रीच्या पार्टीचा प्लॅन बनवला.

"साहिल माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपण लग्न करुयात" पार्टीत दारूच्या नशेत सर्वांसमोर ती बोलली.
साहिल काहीच बोलला नाही. साहिल विवाहित आहे ते माहिती असूनही तिने त्याला प्रपोज केले होते.

ईशाच्या आईवडिलांनी आपल्या एकुलत्या एक मुलीला ही विचित्र जीवनशैली असलेली सिनेसृष्टी सोडून पिढ्यानपिढ्या सुरू व्यवसायात लक्ष्य घालण्याचा सल्ला दिला होता. या व्यवसायावर बरेच नातेवाईक डोळा ठेवून होते.पण 'यशा'च्या नशेत असलेल्या ईशाने या सर्वांकडे कानाडोळा केला. आणि तिचा अभिनय प्रवास तिने पुढे सुरु ठेवला.

तिचा असा ठाम विश्वास होता की साहिल ही तिच्यावर प्रेम करतो आहे.पण मनातील सांगत नाही. तिने त्याना अनेकवेळा वेगवेगळ्या मार्गाने प्रेमसंदेश दिले. बायकोच्या आणि घरच्या तणावाने साहिल असा वागतो आहे असे तिला वाटत होतं. एकदातर सेटवर तिने साहिलच्या बायकोशी कडाक्याचे भांडण केल होत. दिवसेन दिवस तिच्या डोक्यात फक्त साहिल आणि त्याचा परिवार याच विचार फिरत होता. त्यामुळे तिचे कामात लक्ष कमी झाले होते. दारू सिगरेटचे व्यसन वाढले होते. परिणामी तिला मिळणारे प्रोजेक्ट कमी झाले.

अचानक एक दिवस ती गायब झाली. काही महिन्यानंतर समजलं की ती परदेशी आहे.तिने काही नवीन मित्र मैत्रिणी बनवले होते व ती एकदम धार्मिक मार्गात वळली होती. त्या ठिकाणाहुन ही साहिलला मेसेज करत होती. लग्नासाठी तिचा अट्टाहास चालला होता. काही दिवसांनी अचानक ती घरी परत आली. बराच वेळा स्वतःला एका रूममध्ये कोंडून घेत होती. कधी अचानक विनाकारण रडणे चाललं होतं तर कधी प्रचंड राग आणि तोडफोड करत होती. तिच्या बोलण्यावरचा ताबाही सुटत होता. कधी कधी ती आवेशात रागाच्या भरात आपल्या म्हाताऱ्या आईलाही शिवीगाळ करत व मारत होती.

अचानक एक दिवस तिने साहिलच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. 'साहिल पासून तिच्या जीवाला धोका आहे' असे तिची तक्रार होती. पोलीस स्टेशनमधील चौकशी नंतर साहिलला घरी सोडण्यात आलं. पण तिचं साहिलचा पाठलाग करणे चालू होतं.

काही दिवसांनी तिने आईच घरही सोडलं. ती आता एकटी राहू लागली.तिचं वागणं खूप बदललं होत. कौटुंबिक संपत्ती असल्याने उपजीविकेची चिंता तिला नव्हती. तिने 'पोलीस व साहिल सोबत मिळून तिला त्रास देत आहेत'अशी तक्रार आणि मुलाखत मीडियाला दिली. सर्वत्र खळबळ माजली.तरी ही साहिल काही बोलला नाही.

काही महिने शांत गेले.ती पुन्हा बेपत्ता झाली. अचानक एक दिवस एका हॉटेलमध्ये तिचा मृतदेह सापडला. तिने तिच्या हाताची नस कापून घेतली होती आणि सोबत विष प्राशन केलं होतं. तिने स्वतःच आयुष्य संपवून घेतलं होतं.

पोलिसांनी साहिलला चौकशीला बोलावले.

"तुम्ही तिच्या मृत्यूला जबाबदार आहात असा प्राथमिक अंदाज आहे" इन्स्पेक्टर दामले बोलले.

" हो असेलही कदाचित!" साहिलच्या डोळ्यात पाणी भरलं होत.

"म्हणजे तिने तुमच्यामुळे आत्महत्या केली हे तुम्हाला मंजूर आहे" इन्स्पेक्टर रागात बोलले.

साहिल ने मोबाईल खिशातून काढला. इनबॉक्स ओपन करत तो म्हणाला ,
" हे सर्व दोन वर्षां पासूनचे sms आहेत.तुम्ही वाचा.तुम्हाला सर्व समजेल"

इन्स्पेक्टर साहेबांनी तासभर ते सर्व मॅसेज वाचले आणि ते म्हणाले
" थोडं विचित्र वाटतंय हे सर्व. तुम्ही पोलिसांना का नाही सांगितले."

"सर, पोलिसाना तक्रार करून काही फायदा नव्हता. तिच्या 'ह्या' वागण्या बद्दल मी तिच्या कुटुंबाला भेटलो होतो. तिला त्यांनी डॉक्टरकडे ही दाखवलं होत. थोडे दिवस तिने औषधेही केली. त्या काळात ती बरी होती. मग तिने औषधे बंद केली. आणि हे सर्व घडलं." साहिल बोलला.

साहिल माझ्यावर प्रेम करतो हा विचार तिच्या मनी पक्का झाला होता. पण त्या विचारा पलिकडेचे तिचे वागणे त्या मेसेजेस मधून दिसत होतं. तिने साहिल सांगितले लिहल होते की तिला देवांचे आणि काही अनोळखी लोकांचे आवाज येत आहेत आणि ते आवाज दिला आदेश आणि शिकवण देत आहेत. त्या आवाजाच्या भ्रमात ती परदेशी गेली होती. तिथेही तिने आपल्या शेजारी राहणाऱ्या लोकांबद्दल पोलिस तक्रार केली होती.

सेटवर लोक तिच्या बद्दल बोलतात आणि तिला जीवे मारण्याचा प्लॅन करत आहेत असंही तिने वारंवार लिहल होत. तिला मारण्यासाठी इंटरनॅशनल गॅंग तिच्या मागे आहे आणि ते लोक तिच्यावर घरी पाळत ठेवत आहेत म्हणून तिने घरही सोडल होत आणि ती हॉटेलमध्ये राहत होती. पण तिथेही तिची भिती आणि संशय इतका वाढला होता की ती रूम मधून बाहेर ही निघत नव्हती. कोणी जेवणात विष देईल ह्या भितीने तिने जेवण करणे ही बंद केलं होतं. शेवटी शेवटी तिच्या कानावर येणाऱ्या भासांचे प्रमाण खूप वाढले होते. त्या भीतीदायक आयुष्याला कंटाळून तिने आपलं आयुष्य संपवलं होत.

पोलिसांनी तिचा मोबाईल चेक केला त्यामध्ये तिने ई-मेल द्वारे अनेक लोकांविरुद्ध एका अनोखा ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. तिच्या डायरीत ही बरेच चित्रविचित्र लिखाण तिने केलं होतं. तिच्या आई बाबांनी पोलीस स्टेशनमध्ये आपला जबाब दिला आणि तिची मेडिकल फाईल जमा केली. त्यावर मनोविकार तज्ञाच निदान होत 'पॅरानाईड स्किझोफ्रेनिया' आणि सल्ला होता उपचार बंद न करण्याचा!!!!

मित्रांनो की कथा तुम्हाला *काल्पनिक,रहस्यमय,अधुरी* वाटेल. पण काल्पनिक नक्कीच नाही ;गेल्या दहा वर्षांत माझ्या प्रॅक्टिस मध्ये अनेक अश्या खऱ्या केसेस मी पहिल्या आहेत. रहस्यमय ? हो! कारण मानसिक आरोग्य व आजार आजही दुर्दैवाने आपल्या देशात रहस्यमय आहेत. मग अधुरी? हो नक्कीच! ही कहाणी अधुरी आहे. कारण ईशाचे आयुष्य साहिल आणि तिच्या पालकांच्या अधुऱ्या प्रयासाने व योग्य उपचारा अभावी लवकर संपलं. कथा पूर्ण झाली असली तरी व्यथा मांडण व सोडवण अधुरच राहिले होते. चला तर ही अधुरी कहाणी आज आपण पूर्ण करू.

लोकहो, 'पॅरानाईड स्किझोफ्रेनिया' हा शब्द आणि आजार दोन्हीही खूप किचकट. सर्वंसामान्य लोक याला 'वेड लागण' अस बोलतात. हा आजार आजही भारतात सामाजिक कलंक समजला जातो. रस्त्यावर फिरणारे;चित्रविचित्र वागणारे व समाजाने घोषित केलेले वेडे हा ही स्किझोफ्रेनिया ह्या आजाराचा प्रकार.

स्किझोफ्रेनिया हा गंभीर प्रकारचा मानसिक आजार व मेंदूचा विकार आहे. स्किझोफ्रेनियामध्ये मेंदुमध्ये रासायनिक बदल व दोष निर्माण होतो. त्याचा विचार,भावना व वागणूक यावर परिणाम होतो. मग व्यक्तींचा वास्तवाशी संबंध तुटतो व ते स्वत: भ्रामक व आभासी जगात जगू लागतात. त्यांचा मनावरचा ताबा सुटतो. मात्र वेळीच उपचार केल्यास यातून बाहेर पडता येते.

स्किझोफ्रेनिया या आजाराची सुरूवात तरूण पणात होते. दर हजार व्यक्तीमध्ये एक व्यक्तीला हा मनोविकार असू शकतो.हा आजार दीर्घकालीन असला तरी योग्य आणि लवकर उपचार केल्यास रूग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो.

स्किझोफ्रेनिया ची लक्षणे पुढील प्रमाणे असतात. विनाकारण चिडचिड, प्रचंड राग, एकलकोंडेपणा, स्वतःकडे नीट लक्ष न देणं, स्वच्छता न पाळणं, कानामध्ये विचित्र भास होणं,मनात चित्रविचित्र शंका येणे, विनाकारण संशय येणं, स्वतःशी पुटपुटणं,एकटच विनाकारण हसणे, हातवारे करणं अशी लक्षणे जर ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ जाणवली व त्याचा त्या व्यक्तीच्या कौटुंबिक,सामाजिक व व्यावसायिक आयुष्यावर परिणाम होऊ लागला तर याला ‘स्किझोफ्रेनिया’ आजार झाला आहे असे म्हणता येईल.

हा आजार होण्याची मुख्यतः कारणे आनुवंशिकता, मेंदूत होणारे रासायनिक बदल आणि आजूबाजूची परिस्थिती (ताणतणाव, गांजा सारख्या अमलीपदार्थाचे व्यसन, जन्माच्या वेळी काही त्रास इत्यादी आहेत. आई वडिलांपैकी कोणाला असेल तर १० ते २० टक्के आजार होण्याची शक्यता असते. मेंदूमधील डोपामाईन नावाचे रसायनाचे प्रमाण वाढल्यास त्रास होऊ शकतो.

जरी आजार गंभीर असला तरी लवकर निदान होऊन योग्य, दीर्घकालीन उपचार आणि जीवनशैलीमधील बदल केल्यास रूग्ण सर्वसामान्य जीवन जगू शकतो. ३०-४० टक्के रूग्ण पूर्णपणे बरे होतात. ३०-४० टक्के रूग्णांमध्ये मधून-मधून लक्षणं जाणवतात. २० टक्के रूग्ण मात्र पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत आणि त्यांना आयुष्यभर उपचार सुरू ठेवावे लागतात.

उपचारपद्धतीत प्रामुख्याने औषधोपचार (अँटीसायकोटीक)चा वापर केला जातो. आधुनिक औषधांनी आजार त्वरित आटोक्यात येऊ शकतो. जर औषधांनी फरक पडला नाही किंवा रूग्ण खूपच हिंसक झाला किंवा औषधोपचार घेण्यास नकार दिल्यास रूग्णालयात दाखल करून इ.सी.टी. (विद्यूत लहरींचा उपचार) ही करावा लागतो. काही रूग्णामध्ये औषधं देण्यात अनियमितता असेल तर दीर्घकाळ शरीरात राहणारी इंजेक्शन उपलब्ध आहेत.

औषधोपचाराबरोबर रूग्ण आणि रूग्णाचे नातेवाईक यांचं समुपदेशन महत्त्वाचं असतं.काही रूग्णांच्या बाबतीत पुनर्वसनाच्या सोयींचा (रिहॅबिलिटेशन) वापर करावा लागतो ज्यामुळे दैनंदिन आयुष्याला शिस्त लावणं, कामाकरीता प्रोत्साहित करणं, स्वावलंबी बनवणं ज्यामुळे रूग्ण पुन्हा समाजात मिसळण्यासाठी तयार होऊ शकतो. नातेवाईक किंवा रूग्णाचा सांभाळ करणारे यांचे सहकार्य - नियमित औषधोपचारात रूग्णाला समजून घेण्यात आणि सतत प्रोत्साहित करण्यात आवश्यक असते.

मित्रांनो , आज 24 मे जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिवस. अज्ञानाच्या अंधारामुळे ह्या मानसिक आजारावर आजपर्यत आशेचे किरण पडले नाही. पण आता 'स्किझोफ्रेनिया' ह्या मानसिक आजाराची भिती न बाळगता जनजागृती करणे गरजेचे आहे. जसे शरीराचे आजार होतात तसे मनालाही आजार होतात. *हाड फ्रॅक्चर झालं तर प्लास्टर केलं जातं मग मन फ्रॅक्चर होऊन स्किझोफ्रेनिया झाला तर त्याच प्लास्टर करायला नको का? 'स्किझोफ्रेनिया' जरी असला तरी माणसे आहेत , प्रेम नसेल द्यायचे तरी किमान दोष आणि द्वेष तर नका देऊ.*

*मनोविकार तज्ञ होणे सर्वांना शक्य नाही पण मनोमित्र बनणे खूप सोपं आहे. मनापासून मनांसाठी काहीतर करायचं असेल तर आजच आपलं मन अंधश्रद्धेतुन मोकळं करा आणि 'स्किझोफ्रेनिया' सारख्या मनोविकारांवर मनोविजय साजरा करण्यास आम्हाला मदत करा.*

*डॉ सुरेश पाटील*
*मनोविकार व मनोविकास तज्ञ*
वसई नालासोपारा विरार
9987230222

23/05/2021

*एक अधूरी कहानी......*

डॉ सुरेश पाटिल

आज वह बहुत खुश थी। देश की जानी-मानी सिनेमैटिक मैगजीन के कवर पेज पर उनकी फोटो छपी। अपने करियर के सिर्फ तीन साल में उन्होंने दस सुपरहिट फिल्में दी थीं। उनके पीछे ढेर सारे फैंस थे।
उच्च शिक्षित ईशा ने अभिनेत्री बनने का फैसला किया था। उन्होंने जाने-माने नायक और अपने सह-कलाकार 'साहिल' को फोन किया और एक रात की पार्टी की योजना बनाई।

"साहिल, आई लव यू। चलो शादी करते हैं," उसने पार्टी में सबके सामने कहा।
साहिल ने कुछ नहीं कहा। उसने साहिल को यह जानते हुए भी प्रपोज किया था कि वह शादीशुदा है।

ईशा के माता-पिता ने अपनी इकलौती बेटी को इस विचित्र जीवन शैली को छोड़कर पीढ़ियों से चले आ रहे व्यवसाय पर ध्यान केंद्रित करने की सलाह दी थी। इस धंधे पर कई रिश्तेदारों की नजर थी लेकिन 'यशा' के नशे में धुत ईशा ने इस सब से आंखें मूंद लीं और उन्होंने अपने अभिनय की यात्रा जारी रखी।

उसे यकीन हो गया था कि साहिल उससे प्यार करता है। वह अक्सर उन्हें अलग-अलग तरीकों से प्रेम संदेश देती थी। उसे लगा कि साहिल पत्नी की तरह व्यवहार कर रहा है। और घर में तनाव के कारण, एक बार सेट पर उनकी साहिल की पत्नी से तीखी नोकझोंक हो गई थी। इस बारे में दिन-ब-दिन सिर्फ साहिल और उनका परिवार ही सोच रहा था। नतीजतन, वह अपने काम पर कम ध्यान केंद्रित कर रही थी। शराब और सिगरेट की लत बढ़ गई थी। नतीजतन, उसे प्राप्त परियोजनाओं की संख्या कम हो गई।

अचानक एक दिन वह गायब हो गई। कुछ महीनों के बाद, मुझे एहसास हुआ कि वह विदेश चली गयी थी उसने कुछ नए दोस्त बनाए थे और वह एक बहुत ही धार्मिक रास्ते में बदल गई थी। वह उस जगह से साहिल को मैसेज कर रही थी। वह शादी के लिए लड़ रही थी। कुछ दिनों बाद वह अचानक घर लौट आई। कई बार उसे एक कमरे में बंद कर दिया जाता था। कभी वो बिना वजह रो रही थी तो कभी बहुत गुस्सा और परेशान। वह अपना आपा खो रही थी। कभी-कभी तो वह अपनी बूढ़ी मां को गालियां भी देती थी।

अचानक एक दिन उसने साहिल के खिलाफ थाने में शिकायत दर्ज कराई। उसने शिकायत की, "साहिल से उसकी जान को खतरा है।" थाने में पूछताछ के बाद साहिल को घर छोड़ दिया गया। लेकिन वह साहिल का पीछा करती रही।

कुछ दिनों बाद वह अपनी मां के घर चली गई। वह अब अकेली रह रही थी ,उसका व्यवहार बहुत बदल गया था। पारिवारिक संपत्ति होने के कारण उसे जीविकोपार्जन की चिंता नहीं करनी पड़ती थी। उसने मीडिया से शिकायत की कि पुलिस और साहिल उसे परेशान कर रहे हैं। हर तरफ शोर था, लेकिन यह साहिल कुछ नहीं बोला।

कुछ महीने चुपचाप बीत गए। वह फिर गायब हो गई। अचानक एक दिन उसका शव एक होटल में मिला। उसने अपनी बांह में एक नस काट ली थी और उसके साथ जहर खा लिया था। उसने अपने दम पर अपनी जीवन लीला समाप्त कर ली थी।

पुलिस ने साहिल को पूछताछ के लिए बुलाया।

इंस्पेक्टर दामले ने कहा, "प्राथमिक धारणा यह है कि आप उसकी मौत के लिए जिम्मेदार हैं।"

"हाँ शायद!" साहिल की आंखों में आंसू आ गए।

"मेरा मतलब है, आपकी वजह से उसने आत्महत्या की है ," इंस्पेक्टर ने गुस्से में कहा।

साहिल ने जेब से मोबाइल निकाला। इनबॉक्स खोलते हुए उन्होंने कहा,
"ये सभी दो साल के एसएमएस हैं। आप पढ़िए। आप सब कुछ समझ जाएंगे"

इंस्पेक्टर साहब ने उन सभी संदेशों को एक घंटे तक पढ़ा और कहा
"यह सब थोड़ा अजीब लगता है। आपने पुलिस को क्यों नहीं बताया?"

"सर, पुलिस में शिकायत करने का कोई मतलब नहीं था। मैं उसके परिवार से उसके व्यवहार के बारे में मिला था। उन्होंने उसे डॉक्टर को दिखाया था। उसने कुछ दिनों के लिए दवा भी ली थी। वह उस समय ठीक थी। फिर उसने दवा लेना बंद कर दिया। और यह सब हुआ। " साहिल बोला।

यह सोचकर कि साहिल मुझसे प्यार करता है, उसे यकीन हो गया था। लेकिन उसका व्यवहार उन सवालों से परे था। उसने साहिल से कहा कि देवताओं और कुछ अजनबियों की आवाजें उसके पास आ रही थीं और वे आदेश और शिक्षा दे रहे थे। वह उस आवाज के भ्रम में विदेश चली गई थी। वहां भी उसने अपने पड़ोसियों के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराई थी।

वह अक्सर लिखती थी कि सेट पर लोग उसके बारे में बात कर रहे थे और उसे मारने की योजना बना रहे थे। उसे मारने के लिए अंतरराष्ट्रीय गिरोह उसके पीछे है और वे घर पर उस पर नजर रख रहे हैं इसलिए वह घर छोड़कर एक होटल में रह रही थी। लेकिन वहां भी उसका डर और शक इतना बढ़ गया था कि वह कमरे से बाहर भी नहीं निकलती थी। जहर खाने के डर से उसने खाना बंद कर दिया था। आखिरकार उसने जितनी भाषा सुनी, उसमें बहुत वृद्धि हुई। उस डरावनी जिंदगी से तंग आकर उसने अपनी जीवन लीला समाप्त कर ली थी।

पुलिस ने उसका मोबाइल चेक किया जिसमें उसने कई लोगों के खिलाफ ई-मेल के जरिए एक अनोखी जगह पर शिकायत दर्ज कराई थी। उसने अपनी डायरी में बहुत रंग-बिरंगा लेखन किया था। उसके माता-पिता ने पुलिस स्टेशन में अपना जवाब दिया और उसकी मेडिकल फाइल जमा की। मनोचिकित्सक ने उन्हें 'पैरानॉयड सिज़ोफ्रेनिया' का निदान किया और उन्हें इलाज बंद न करने की सलाह दी !!!!

दोस्तों कहानी आपको *काल्पनिक, रहस्यमय, अधूरी* लगेगी। लेकिन निश्चित रूप से काल्पनिक नहीं; पिछले दस वर्षों में मैंने अपने अभ्यास में ऐसे कई वास्तविक मामले देखे हैं। रहस्यमय? हाँ! क्योंकि हमारे देश में मानसिक स्वास्थ्य और बीमारी दुर्भाग्य से आज भी एक रहस्य है। इतना अधूरा? हां बिल्कुल यह कहानी अधूरी है। क्योंकि साहिल और उसके माता-पिता के अधूरे प्रयासों और उचित इलाज के अभाव में ईशा की जिंदगी जल्दी खत्म हो गई।
हालांकि कहानी खत्म हो गई थी, पर शिकायतें अनसुलझी रहीं। आइए आज इस अधूरी कहानी को खत्म करते हैं।

'पैरानॉयड सिज़ोफ्रेनिया' शब्द और बीमारी दोनों ही बहुत जटिल हैं। आम लोग इसे 'वेड इंफेक्शन' कहते हैं। इस बीमारी को अभी भी भारत में एक सामाजिक कलंक माना जाता है। सिज़ोफ्रेनिया मनोभ्रंश का एक रूप है।

सिज़ोफ्रेनिया एक गंभीर मानसिक बीमारी और मस्तिष्क विकार है। सिज़ोफ्रेनिया मस्तिष्क में रासायनिक परिवर्तन और दोषों का कारण बनता है। यह विचारों, भावनाओं और व्यवहार को प्रभावित करता है। तब व्यक्ति वास्तविकता से संपर्क खो देता है और एक भ्रम और आभासी दुनिया में रहने लगता है। वे अपने दिमाग पर नियंत्रण खो देते हैं। लेकिन अगर समय रहते इसका इलाज किया जाए तो यह ठीक हो सकता है।

सिज़ोफ्रेनिया किशोरावस्था में शुरू होता है। एक हजार में एक व्यक्ति को यह स्थिति हो सकती है हालांकि यह बीमारी पुरानी है, उचित और प्रारंभिक उपचार के साथ, रोगी सामान्य जीवन जी सकता है।

सिज़ोफ्रेनिया के लक्षण इस प्रकार हैं। चिड़चिड़ापन, अत्यधिक क्रोध, अकेलापन, खुद पर ध्यान न देना, साफ-सफाई न रखना, कानों में अजीबोगरीब भावना, मन में अजीबोगरीब शंका, बेवजह शक, खुद से बड़बड़ाना, बिना वजह अकेले हंसना, 6 से ज्यादा महीने यह सब लक्षण रहे और अगर यह किसी व्यक्ति के पारिवारिक, सामाजिक और व्यावसायिक जीवन को प्रभावित करता है, तो इसे 'सिज़ोफ्रेनिया' कहा जा सकता है।

इस रोग के मुख्य कारण आनुवंशिकता, मस्तिष्क में रासायनिक परिवर्तन और आसपास की स्थितियां (तनाव, नशीली दवाओं की लत जैसे मारिजुआना, कुछ जन्म दोष, आदि) हैं। यदि माता-पिता में से किसी एक को रोग हो तो उनके बच्चों में होने की 10 से 20 प्रतिशत संभावना रहती है। मस्तिष्क में डोपामाइन नामक रसायन का स्तर अधिक हो सकता है।

बीमारी गंभीर होने पर भी, रोगी शीघ्र निदान और उचित, दीर्घकालिक उपचार और जीवन शैली में परिवर्तन के साथ सामान्य जीवन जी सकता है। 30-40% मरीज पूरी तरह ठीक हो जाते हैं। 30-40% रोगियों को आंतरायिक लक्षणों का अनुभव होता है। हालांकि, 20% रोगी अच्छी प्रतिक्रिया नहीं देते हैं और उन्हें जीवन भर उपचार जारी रखना पड़ता है।

Antipsychotics मुख्य रूप से उपचार में उपयोग किया जाता है। आधुनिक चिकित्सा इस बीमारी को जल्दी ठीक कर सकती है। यदि दवा से कोई फर्क नहीं पड़ता है या रोगी बहुत अधिक हिंसक हो जाता है या दवा लेने से इंकार कर देता है, तो ई.सी.टी. (विद्युत तरंगों का उपचार) करना पड़ता है। यदि कुछ रोगियों में दवा का अनियमित प्रशासन होता है तो दीर्घकालिक इंजेक्शन उपलब्ध होते हैं।

दवा के साथ-साथ रोगी और रोगी के रिश्तेदारों के बीच परामर्श महत्वपूर्ण है। कुछ मामलों में पुनर्वास का उपयोग दैनिक जीवन को अनुशासित करने, काम को प्रोत्साहित करने और आत्मनिर्भर बनने के लिए किया जाना चाहिए ताकि रोगी समाज में फिर से जुड़ने के लिए तैयार हो सके। रोगी के रिश्तेदारों या देखभाल करने वालों का सहयोग - नियमित दवा के लिए रोगी की समझ और निरंतर प्रोत्साहन की आवश्यकता होती है।

दोस्तों आज ' 24 मई विश्व सिज़ोफ्रेनिया जागरूकता दिवस' है। अज्ञानता के अंधेरे के कारण आज तक इस मानसिक बीमारी के लिए आशा की कोई किरण नहीं है। लेकिन अब सिज़ोफ्रेनिया के डर के बिना जागरूकता बढ़ाने की जरूरत है। जैसे शरीर बीमार होता है वैसे ही मन भी बीमार हो जाता है। * हड्डी में फ्रैक्चर हो,तो प्लास्टर लग जाए,पर दिमाग में फ्रैक्चर हो और सिजोफ्रेनिया हो तो क्या वही प्लास्टर नहीं लगाना चाहिए? सिज़ोफ्रेनिया वाले लोग हैं, लेकिन अगर आप प्यार नहीं देना चाहते हैं, तो कम से कम दोष और नफरत न करें। *

*मनोचिकित्सक बनना हर किसी के लिए संभव नहीं है लेकिन मनोवैज्ञानिक बनना बहुत आसान है। अगर आप अपने दिल की खातिर कुछ करना चाहते हैं, तो आज ही अपने दिमाग को अंधविश्वास से मुक्त करें और सिज़ोफ्रेनिया जैसी मानसिक बीमारियों को दूर करने में हमारी मदद करें। *

*डॉ सुरेश पाटिल*
*मनोचिकित्सक *
वसई नालासोपारा विरार
9987230222

*मी पाहिलेली भूतं**डॉ सुरेश पाटील*लेखाचं शीर्षक वाचून काही जणांचे डोळे विस्फारले जातील, काही जणांच्या मनात अनामिक भिती व...
28/02/2021

*मी पाहिलेली भूतं*

*डॉ सुरेश पाटील*

लेखाचं शीर्षक वाचून काही जणांचे डोळे विस्फारले जातील, काही जणांच्या मनात अनामिक भिती व उत्सुकता निर्माण होईल तर काही जणांना आपल्या आवडत्या विषयावर काही तर वाचायला मिळत आहे याचा आनंद होईल. 'भूत' ह्या शब्दाची जादू , बाकी काही नाही. लहानपणी भुताच्या भीतीदायक गोष्टी ऐकल्या नाहीत अशी मुले दुर्मिळ. आजी,आजोबानी त्यांनी पाहिलेल्या , मैत्री केलेल्या भुतांच्या कथा सर्वजनांनी ऐकलेल्या असतात. पांढऱ्या रंगाची कपडे घालून उलट्या पायाने चालणारी अमावस्येला चिंच पिंपळाच्या झाडावर राहनाऱ्या पावरफुल्ल भुतांचे भीतीदायक रंजक किस्से ऐकून, 'भूत' या शब्दाने आपल्याला लहानपणापासून झपाटलेले असते. त्यात आर्थिक सामाजिक पिछाडीवर असलेल्या आपल्या अविकसित देशात भूताने 'पछाडलेल्या' लोकांची संख्या भरपूर. 'तात्या विंचू' च्या बाहुल्या पासून 'अनाबेला' च्या डॉल पर्यंत जगभर चित्रपटातुन भुतांचा वावर. त्या सर्वांतुन 'भुत' हा शब्द मानगुटीवर बसतो. पण भुत हे सर्व मेलेल्या व्यक्तीच होत नाही बर का ! अतृप्त आत्मा त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झाड(व्यक्ती) पकडतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करतो हा पूर्वापार चालत आलेला समज. लहानपणीपासून भुताच्या कथा सांगणारे खूप भेटले असतील पण भूत पाहिलेला कोणी भेटला नसेल. पण आज माझ्यारूपी भेटेल!

माझ्या दररोजच्या ओ.पी.डी मध्ये मी दोन चार भुते तर मी पाहतो. परवा तलासरीच्या एका गावातून एक कुटूंब आपल्या रामू नावाच्या रुग्णाला घेऊन माझ्याकडे आलं होतं. त्यांच्या गावातील एकाच भूत माझ्याकडे आल्यावर गेलं होतं, त्यांच्याकडून माझा पत्ता घेऊन आले होते.
" डॉक्टर साहेब, ह्याला वाचवा! गेल्या वर्षभर ह्याला हडळ लागली आहेत. तिचे आवाज ऐकू येतात याला!रात्रभर ती झोपून देत नाही. हा तलाठी म्हणून कामाला आहे पण वर्षभर कामाला गेला नाही.आतातर अंघोळ पण करत नाही, काहीतरी बडबडत गावात फिरत राहतो. तांत्रिक, मांत्रिक, दर्गा पण केले पण काहीच फरक नाही पडला. आताच तुम्हीच काहीतरी करा" भूत पीडित रुग्णांचे वडील बोलले. मी सर्व नातेवाईकांना केबिन बाहेर काढून रुग्णांनी संवाद साधला. नातेवाईकांना बोलवून त्या रुग्णांचा भुताचा उतारा कम उपचार करायचा म्हणून त्याला ऍडमिट करायला सांगितले.

थोड्याच वेळात अजून एक भूतबाधेचा रुग्ण आला. एका जेनिफर नावाच्या स्त्रीला घेऊन आणखी एक कुटूंब आलं. बाहेरची बाधा झाल्याने तिची वाचा दोन दिवसांपासून बंद झाली होती. दारुडा नवरा;तीन पोर आणि त्रास देणारी सासू यांच्या बरोबर दोन दिवस माहेरची लोक बाहेरच आणि देवाधर्माच बघत होते. गंडे दोरे,मंतरलेले पाणी देऊन झालं होतं. कुण्या एका चर्चच्या फादरने माझ्याकडे पाठवले होते. मी तिच्या नातेवाईकांशी बोललो आणि सिस्टरला सांगितले,
" ते खूप छान इंजेक्शन मागवून घ्या, हिला सलाईन मधून ते इंजेक्शन देऊ. बरी होईल मग लगेच घरी पाठवू."

रात्री उशिरा एक फोन आला.
" सर, थोडी तुमची मदत हवी होती. माझ्या 'सलमान' नावाच्या भाच्याला एक विचित्र त्रास चालू आहे. त्याच्यात एक आत्मा घुसला आहे. दिवसभरातून एकदा तरी तो आत्मा त्याच्यावर ताबा घेतो. इंग्लिश बोलतो, सिगारेट मागतो, बराच वेगळा गोष्टीची मागणी करतो. लोकांनी त्यांच्या पाया पडले, त्याचे हठ्ठ पुरवले की निघून जातो. पण माझ्या भाच्याला त्यानं कायमच झाड केलं आहे असे दर्ग्यावर सांगितले. काही ठिकाणी बाबांनी त्याला बांधून चपलाने मारले, मिरचीची धूर दिली. तो त्रास बघवेना म्हणून मी चौकशी करून ; तूमच नाव मिळवलं. आता तुम्ही बघा काय करायचं. मी रुग्णांशी बोलल्यावर त्याला उपाशी पोटी सकाळी हॉस्पिटलमध्ये भूत उतारासाठी बोलवलं.

ओ.पी.डी नंतर सिस्टरने विचारलं , सर तीन प्रकारची भुत पण उपाय वेगवेगळे का?
"अग, नसलेल्या भुतांच्या ह्या असलेल्या बाधा आहेत. बाहेरची बाधा असली तरी उपाय आतच आहे" मी हसत बोललो.

'भूत लागण वा झपाटने' ही पूर्वापार चालत आलेली संस्कृती व विचारसरणी.दिसणाऱ्या नैसर्गिक वा अनैसर्गिक संकटाच खापर फोडण्यासाठीची मनाने केलेली समाजमान्य गोष्ट. शारीरिक आजाराची कारण असतात हे लोक आता मान्य करू लागली आहेत. कारण तिथे कारण दाखवण्यासाठी अवयव असतो. पण 'मन'काही दिसत नाही त्यामुळे जवळपास सर्वच मानसिक आजार हे भुतबाधा, देवाची अवदृष्टी वा करणी जादूटोणा यातून होतात अशी बराच लोकांची धारणा आहे. पुस्तकी ज्ञान घेऊन सुशिक्षित म्हणवणारे लोकही ह्यामध्ये आहेत. मेडिकल सायन्स आत्मा मानत नाही. कारण मेडिकल सायन्सने आत्मा विषयाचा अभ्यास केला पण आत्मा सापडला नाही. ज्या गोष्टीचा पुरावा नाही; ती गोष्ट विज्ञान मानत नाही म्हणून 'भुत' या गोष्टीवर विज्ञान विश्वास ठेवत नाही. याचाच अर्थ या जगात भूत नसते , खरे 'भूत' माणसाच्या डोक्यात असते, खरे तर माणूस मेल्यानंतर सर्व नष्ट होते. त्यामुळे आठवण, ओळख या गोष्टीच शिल्लक राहत नाही. तरीपण भूत झपाटते, अंगात कसे येते ते आपण पाहू!

सर्वच्या सर्व भूतबाधाचा उगम हा मानसिक आहे. काही मानसिक अवस्थेत तर काही मानसिक आजारामुळे. आजचा पहिला रुग्ण रामू 'स्किझोफेर्निया' नावाच्या मानसिक आजाराने ग्रस्त होता. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या या व्यक्तीच्या वागण्यात बोलण्यात अचानक बदल झाल्याने ह्या बाहेरील बाधा झाली असावी अशी शंका घरातील लोकांना आली. तांत्रिक, मांत्रिक ,देवऋषि नी 'भूतबाधा' या निदानावर शिक्कामोर्तब केले. वर्षभर अनेक अघोरी उपाय केले तरी रामू मध्ये काहीच फरक पडला नाही. मग शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी मानसोपचार कडे आणले. पण आजारपण खूप जुने झाल्याने त्याला ऍडमिट करून उपचार करने गरजेचे झाले. विद्यूत लहरींचा (ECT) वापर करून महिन्याभरात रामू पहिल्या सारखा झाला. कुटुंबा आश्चर्यचा धक्का बसला. चमत्काराला नमस्कार करण्याची समाजाचा स्वभाव असतो. हा वैज्ञानीक चमत्कार केल्यावर त्या मागील शास्त्र समजावून सांगून समाजात 'मनक्रांती' करण्याची हीच ती वेळ. अश्या मानसिक आजराने तयार झालेले भूत हे फक्त आणि फक्त मानसोपचार तज्ञ डॉक्टर उतरवू शकतो पण त्याच्या सल्लाशिवाय जर उपचार बंद केले तर भुत परत मानगुटीवर बसणार हे नक्की!

दुसऱ्या केस मधील जेनिफरच अचानक मूक होणं; हे काही शारीरिक नव्हते वा भूतबाधा नव्हती. तर तिला 'हिस्टेरिया' या मानसिक आजाराने त्रासले होते. दारुडा नवरा, कजाग सासू आणि पोरांचं संगोपन करता करता तिचं मन तणावात जगत होते. कुटुंबातील लोकांच लक्ष वेधून सहानभूती मिळावी म्हणून अंतर मनाने त्या 'मानसिक' तणावाचे शारीरिक लक्षणात केलेलं रूपांतर म्हणजे हिस्टेरिया. अनेक शारीरिक चाचण्या नॉर्मल आल्यानंतर , सर्व पूजा विधी करूनही जेव्हा फरक पडत नाही त्यावेळी रंगीबेरंगी सलाईन वा इंजेक्शन च्या 'suggestion' थेरपीने आणि समुदेशनाने असे रुग्ण पूर्ण बरे होतात. आपला आजार हा डॉक्टरांना समजला व त्यावर खुप भारी उपचार झाला याने आतील दु:खी अंतर्मन थोडावेळ सुखावते. पण या केसेस मध्ये कुटुंबातील लोकांचे समुदेशन ही महत्वाचे असते.

तिसऱ्या प्रकारची भूतबाधा ही बराच चित्रपटातुन दाखवली जाते. ती multiple personality disorder वा डीसोसिटीव्ह डिसऑर्डर या मानसिक आजाराच्या प्रकारात मोडते. लहानपणी झालेलं शारीरिक मानसिक लैगिंक शोषण, मानसिक धक्के त्यामुळे वार्षिनुवर्षे तयार झालेला मानसिक तणावामुळे अश्या व्यक्तीचे अंतर्मन हे दुभंगले जाते. आणि काही वेळासाठी एक नवीन व्यक्तीमत्व तयार होते.ज्याला समाजाकडून, कुटुंबाकडून मान सन्मान मिळतो. त्याने हे नवीन तयार झालेले व्यक्तीमत्व सुखावते पण पुन्हा पुन्हा त्या आनंदासाठी मूळ मनावर ताबा घेते. मूळ व्यक्तीचे विचार, भावना, स्मृती यापेक्षा नवीन तयार झालेल्या व्यक्तीमत्वाला वेगळी ओळख, भावना, विचार आणि स्मृती असते. पण दुसऱ्या व्यक्तीमत्वाची जाणीव पहिल्या व्यक्तीमत्वाला नसते. अश्या रुग्णांना हिप्नाटीझम वा pentothal इंटरव्ह्यू व औषधुपचारने बराच फरक पडतो.

बराच भूतबाधा ह्या हिस्टेरिया डीसोसिटीव्ह डिऑर्डर वा 'म्यालिंगरिंग – ढोंग सदृश' ह्या प्रकारात मोडतात. 'म्यालिंगरिंग' प्रकारामध्ये लोक कामातून सुटका करून घेण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी व अन्य कारणाने भूताचे सोंग करतात. या देशात बरीच भूतं ही स्रियांना लागतात. त्यातील बहुतांशी ही हिस्टेरिया वा म्यालिंगरिंग या प्रकारात मोडतात. भारतात मुळातच स्रियांना दुय्यम स्थान आहे. अशिक्षितपणा पारंपारिक संस्कार मोकळ बोलण्याची मुभा नसल्याने होणारे भावनाचे दमन हे बऱ्याच कुटुंबातून बघायला मिळते. मुलींचे कमी वयात लग्न, बालपणापासून दुय्यम वागणूक, शिक्षणाची कमतरता व इच्छा आकांक्षाचे दमन, घरातील करावयाला लागणारी भरपूर कामे यामुळे मनावर असह्य ताण निर्माण होतो यातून सुटका करवून घेण्यासाठी भूत वा देवी अंगात आल्याचं ढोंग केल्या जाते. असे केल्याने या स्रियांना घरात सहनुभूतीपुर्वक वागणूक मिळते, नेहमी दुर्लक्ष करणारे लोक हिच्याकडे विशेष लक्ष द्यायला लागतात. अतीजास्त कामांमधून थोडा वेळ का होईना सुटका मिळते.

विश्वास आणि अंधविश्वास यामध्ये चार बोटांच अंतर आहे. डोळ्याने पाहिणे आणि कानाने ऐकणे याने अंधविश्वास होऊ शकतो पण मेंदूच्या सहाय्याने विवेक बुद्धीचा वापर केला तर विज्ञानावर विश्वास तयार होतो. श्रद्धेला विरोध मुळीच नाही पण अंधश्रद्धाच्या रूपाने मानसिक आरोग्याची होणारी हेळसांड वेळीच थांबवणे गरजेचे आहे. जादूटोणा विरोधी कायदाचा योग्य वापर करणे , तांत्रिक, मांत्रिक, भगत, बाबा यांच्यावर कार्यवाही करणे वा मनोआरोग्यशिक्षण देणे आणि समाजात या विषयावर जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. त्यातून जर लोक शहाणी झाली नाहीत तर "इथे सर्व प्रकारच्या भूतबाधेवर शास्त्रीय उतारा व उपचार मिळेल" हे ठळक अक्षरामध्ये देशातील सर्व मानसोपचारतज्ञ डॉक्टरांनी समाजाला सांगितले पाहिजे.

*डॉ सुरेश पाटील*
मानसोपचार व सेक्सविकार तज्ञ
शांति क्लिनिक व विभास हॉस्पिटल
वसई विरार नालासोपारा
*9987230222*

*मनदर्शिका, २०२१ (QR CODE)*We have prepared *QR Code* of calender.You hav to just *Scan* it to download through any *Mob...
30/12/2020

*मनदर्शिका, २०२१ (QR CODE)*

We have prepared *QR Code* of calender.

You hav to just *Scan* it to download through any *Mobile QR Code Scanner*

We can take *printout* of bellow image and stick in Prominent Area of the OPD *Waiting Area or Pharmacy* so that throughout year patients and relatives will be able to utilize it.

We also trying to make *STICKER* of it so tht we can easily paste it...

*Plz Stick, Scan, Download and Share*🙏

*IPS-WZB*
*GTM*
*Dr Suresh Patil*
*Consultant Psychiatrist*
*Secretary,*
*Dahanu to Borivali Psychiatry Society*

*(मानसिक आरोग्याविषयक शास्त्रीय माहितीसाठी Scan करा डाउनलोड करा आणि इतरांना पाठवा)*

With a new year comes new look.... And with it comes new energy... To be always in your service.
24/11/2020

With a new year comes new look.... And with it comes new energy... To be always in your service.

*रहस्य : मौनीबाबा**डॉ सुरेश पाटिल* सह्याद्री डोंगर उतारावर माजलगाव हे एक छोटंसं खेडगावं. गावात एकूण हजार चुली. शेती आणि ...
23/11/2020

*रहस्य : मौनीबाबा*

*डॉ सुरेश पाटिल*

सह्याद्री डोंगर उतारावर माजलगाव हे एक छोटंसं खेडगावं. गावात एकूण हजार चुली. शेती आणि गुरेढोरे पालन हाच धंदा. या गावाच्या वेशीतच मधुकर शिंदेचे घर. दहा एकर जमीन असलेले भांडवली व राजकीय कुटुंब. मोहन हा एकलुता एक मुलगा. चांगलं शिक्षण घेऊन शाळा मास्तर म्हणून तालुक्याला लागलेला. स्वभावाने एकदम सरळ साधा बोलका हसरा. नात्यागोत्यात भावकीत नावाजलेला. पुढे त्याच लग्न होऊन त्याला दोन मुलं झाली.सर्व काही छान आनंदात चाललं होतं.

अचानक एक दिवस शिंदे साहेब हृदविकाराने दगावले.त्यातुन सर्वजण सावरले पण पुढे मोहनने हळूहळू कामाला जाणं कमी केलं.कधी शाळेत गेला तर वेळेत येत नव्हता. घरी दारी त्याच बोलणं कमी झालं.शाळेत पण पहिल्यासारखे शिकवत नाहीत; शांत राहतात अस सहशिक्षक बोलु लागले. घरी तासनतास एकटे बसून राहू लागले. कधी रात्री उशिरापर्यंत झोपतही नसत.कधी कधी एका जाग्यावर नुसतेच पडून असत. 'मोहन मौनव्रत बाळगून आहे की काय?' असं लोकांना वाटत होते. त्याची ही लक्षणे पाहून देवरूषी केला;जत्रा केली; बाहेरच केलं पण फरक नव्हता पडला. "माझं मन नाही लागत , काही करावं वाटतंच नाही असेच तो बोलत होता". कैक नातेवाईक, मित्रांनी विचारलं काही टेन्शन आहे का?कुणी काही केलं आहे का? पण तसं काहीच उत्तर देत नव्हता.

पुढील कित्येक महिने असेच गेले. मौन व्रत धारण करून तो बसल्याने त्याला सर्वजण मोहन ऐवजी 'मौनिबाबा' म्हणू लागलं. त्यानं घर सोडलं ,शेतात राहू अलिप्त राहू लागला.एका वेगळ्या जगात नैराश्याच्या छायेत अडकून पडलेला वाटत होता.

अचानक एक दिवस तो गायब झाला. खूप शोधूनही ठावठिकाणा सापडला नाही. पोलिस तक्रार केली गेली. वर्ष उलटून गेलं. घरातील लोकांनी आशा सोडल्या होत्या. एकदिवस गावात एक साधुबाबा आल्याची चर्चा सुरू झाली. गावातील मंदीरात तो समाधिग्रस्त बसला होता.ओठ्यातल्या ओट्यात मंत्र पुटपुटने चालू होते. कोणी तरी बोललं "हा तर आपला मोहनसारखा दिसतो."
मग त्याला पहायला गाव आनंदानं जमा झाले.

"मोहन,मोहन अरे कुठे होतास करत? त्याची आई त्याला जवळ घेण्यास गेली.

" माते, कोण मोहन? मी मोनिश ऋषी. तुझ्या गावाच कल्याण करायच आहे मला? देवाची तशी आज्ञा आहे मला? असं म्हणत तो स्वगुंगीमध्ये नाचू लागला.

ते पाहून लोकांनाही नाचाचा ठेका घेतला. मोहनला देवाची दिक्षा मिळाली , त्याने हिमालयात तपश्चर्या करून आला आहे, तो चमत्कारिक बाबा झाला आहे' अश्या खबरा सर्वत्र पसरल्या. मोहनचे मोठमोठ्याने बोलणे,कधी इंग्लिश,संस्कृत श्लोक बोलाणे लोकांना वेगळं जादुई वाटू लागलं. हा बाबा गाणी,अभंग,भक्ती गीत गायचा. लोकांना आशिर्वाद द्यायचा. मोठं मोठ्या गोष्टी सांगायचा आणि आपली स्वप्ने कशी पूर्ण कराण्यासाठी त्यांचं प्लॅन करायचं.

हळूहळू त्यानं त्याच्या घरातील सामान गोरगरिबांना वाटायला सुरवात केली. आई बायकोने विरोध केला तर त्यांना मारझोड केली. स्वत:च्या शेतात मंदिर बांधायला घेतलं. दाग दागिने विकून टाकले. त्याच्या मनाविरुद्ध काही झाले तर अचानक भडकतो, बाकी वेळ तो त्याची गांजाची चिलम,त्याची वस्त्रे,जादुई पाणी कमलंडू यात तो दंग असायचा. लोक त्याला "मौजि बाबा" म्हणू लागले. त्यांच्या अंगात अनेक देव आहेत. त्याचे आदेश आणि उपदेश मी सांगतो असे तो बोलत असे. त्याचा दयाळूपणा, दैवीरूप पाहून गावात त्याचे बरेच भक्त तयार झाले.

त्याला भेटायला पंचक्रोशीतील लोक येऊ लागले. त्याच्या आख्यायिका गाऊ लागले. 'मौजि बाबा' काही दिवसात प्रसिद्ध झाला पण मोहनच घर मात्र पूर्ण गडबडल होत. त्याने आपली अर्धी जमीन विकून टाकली होती. सोन नाणं देऊन टाकले होत. कुटूंबाचा त्याग केला होता. स्वतःला संन्याशी झाला होता.

एक दिवस मौजि बाबा बोलला "आता मी समाधी घेणार, मी पूर्ण देवत्व रुपात पोहचणार. माझं पृथ्वी वरील काम संपलं". मग त्यान अन्न पाण्याचा त्याग केला. जंगलात एका झाडाखाली जाऊन तो समाधिग्रस्त झाला. त्याचं हे रुप पाहून मात्र त्याचे घरचे खूप घाबरले. बायकोने शहरातल्या एका उच्छशिक्षित नातेवाईकांना सर्व सांगितले. ते अंधश्रद्धा निर्मूलन च्या सामाजिक कार्यकत्यासह गावी आले. त्यांनी मोहनला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जायचं ठरवलं. 'मौजीबाबा' अनुयायी व अंधश्रद्धा कार्यकर्त्याच्यात चांगलीच झुंपली. पोलीस जमा झाले.
शेवटी 'मौजीबाबा'ला जबरदस्ती ने समाधी स्थळापासून हलवले आणि मोठ्या प्रयत्नांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.

तिथे मनोविकारतज्ञ डॉक्टरांना बोलवण्यात आले. नातेवाईकांनी सुरवाती पासूनची सर्व माहिती डॉक्टरांना दिली.

"गेल्या दीड एक वर्षात होत्याच नव्हते झालं सर.माझं पोर अस नव्हत. याच्या बाबांच्या मरल्यापासून गुपचूप राहत होत. आणि एकदा गायब झाला आणि भेटला तर असा!" डॉक्टरांसमोर मोहनच्या आईने हंबरडा फोडला.

"तुमच्या घरी कोणाला मनाचा त्रास होता का? कुणी आत्महत्या केली होती का? " डॉक्टर ने विचारले.

" डोक्याचा त्रास नव्हता कुणाला पण ह्याच्या आजाने जीव दिला हुता विहिरीत आणि त्याचा एक आत्या थोडी मेंटल सारखी हाय, पर त्याच्या सारखी नाय." त्याची आई हुंदके देत बोलली.

डॉ विजय यांनी मग मोहनला उर्फ मौजीबाबा यांना केबिन मध्ये बोलवले.

" अरे डॉक्टर, घे हे तीर्थ आणि कल्याण करून घे स्वतःचे आणि या पेशंटचे? असे म्हणत न बसता मौनिबाबा गाऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड विचित्र आनंदी भाव दिसत होता. वाढलेली दाढी , अंगावर भस्म, जठा याने तो 'मौजीबाबा' झाला होता की, त्याच्या आजारामुळे हे जाणुन घेणं खूप गरजेचं होतं. त्याच बोलणं खूप फास्ट होत. विषय दोन मिनिटात तो बदलत होता. मोठमोठ्या गोष्टी करत होता. जग कस बदलेल आणि आजार कसे थांबविल हे डॉक्टरांनी सांगत होता. त्याच्याशी बोलणं सोपं होतं पण त्याला थांबवणं कठीण. मधील क्षणांत उठून 'तुम्ही माझी समाधी भंग केली आता; तुमची राख करणार अस चिडून बोलायचा. डॉ विजयने पाच मिनिटांत आपलं निदान आणि उपचारपद्धती मनात तयार केली.

मोहनचे शरीराचे तपास आणि मनाच्या चाचण्या करण्यात आल्या. डॉ विजय यांचे "बायपोलर मूड डिसऑर्डर" निदान पक्के झाले होते.डॉक्टरांनी मोहनला आपल्या मनोविकार विभागात दाखल केल.
त्याच्या नातेवाईकांच्या परवानगी नंतर त्याला विद्युत लहरींचा उपचार( ई. सि. टी.) देण्यात आली. सोबतच औषधेही चालू होती. महिनाभरच्या उपचारांनंतर 'मौजीबाबा' मधील मौज निघून गेली आणि अगदी पहिल्या सारखा मोहन झाला.

गावकऱ्यांनी पाहिलेला हा सर्वात मोठा चमत्कार होता. जो मोहन सर्वसामान्य आयुष्य जगत होता, तो अचानक एकटा एकटा राहू लागला होता मग गायब होऊ 'मौजिबाबा' होऊन आला आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर अगदी पहिल्यासारखा कसा झाला. मोहन , मौनीबाबा आणि मौजीबाबा ते पुन्हा मोहन हेच लोकांना समजत नव्हतं.

"डॉक्टर, काय झालं होतं यांना? आणि आता पुढं काय करायचं?" मोहनच्या बायकोने डॉ विजय यांना विचारलं.

" ताई, मोहनराव फक्त आजारी पडले होते. त्याचा आजारावर योग्य उपचार न झाल्याने केस इथपर्यंत पोहचली. त्यांना "बायपोलर मूड डिओर्डर" हा मानसिक आजार आहे. म्हणजे "कभी खुशी कभी गम " मराठीत दोन धुर्वीय आजार म्हणतात. 'उदासीनता' आणि 'उन्माद' असे दोन प्रकार यात असतात. मोहनच्या आजाराची सुरवात बाबा गेल्यावर 'डिप्रेशन' म्हणजे उदासीनतेने झाली होती पण कुणाच्या ती बाब लक्षात नाही आली. अंधश्रद्धा पोटी सर्व केलं गेलं पण औषधपचार राहून गेला. मग आजार बळावला."

"पण डॉक्टर हा मौजीबाबा कसा झाला असेल?" एका नातेवाईकांने विचारलं

"हा आजाराचा दुसरा भाग. याला उन्माद म्हणतात. म्हणजे 'मॅनिया'. हा ताकदवान टप्प्या असतो. जास्त मोठ्या गोष्टी करणे, स्वतः खूप मोठा माणूस समजलं. अतिखर्च करणे. अतिसमाज सेवा करणे. झोप न घेता फक्त लक्ष्य ठरवून त्याचा माग लागण. गरजेपेक्षा जास्त त्रासदायक रित्या देवाधर्माचं करणं. अचानक नशा चालू करणे. विचित्र निर्णय घेणे. हे सर्व असणारा हा भयंकर टप्प्या. मोहन तर स्वतःला देव समजण्याच्या टप्प्यावर पोहचला होता.खूप छान झालं आपण त्याला ऍडमिट केलं नाहीतर त्याने काही तरी जीवाचं बर वाईट करून घेतलं असत" डॉक्टर विजय यांनी बायपोलर या मनोविकाराची गाथा लोकांना वाचून दाखवली.

"धन्यवाद सर, आता पुढे काय काळजी घेऊ?" मोहन बोलला.

"आमच्या सल्ल्यानुसार आम्ही सांगेलं तसा पुढे औषधपचार चालू ठेव. कितीही बर वाटल , कोणीही सांगितले तरी औषधे बंद करायची नाहीत. कारण आजार बराच वेळा पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता असते. बाकी तू तुझी शिक्षकी नोकरी पुन्हा चालू कर आणि कुटुंबासह आनंदाने जग. आणि जमलंच तर एक शिक्षक म्हणून मानसिक आजाराच्या विषयी प्रबोधन कर."

डॉक्टरच धन्यवाद मानून सर्वजण गावी परतले. मनोविकारातून तयार झालेल्या 'मौजीबाबा' आणि बरोबरच्या अंधश्रद्धाला शहरातील हॉस्पिटलने कायमच संपवलं होत. आता फक्त मनोविकाराबाबत ग्रामीण भागातील 'मौन' संपवन गरजेचे होत.

डॉ सुरेश पाटील
मनोविकार व मनोविकास तज्ञ
वसई नालासोपारा विरार
9887230222

Address

Bungalow No. 1 & 2, Kishor Kunj, Opposite Old Viva College, Bypass Road
Virar
401303

Telephone

9607115500

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vibhas - Vasai-Virar Institute of Behavioral Health and Sciences posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vibhas - Vasai-Virar Institute of Behavioral Health and Sciences:

Share