
28/10/2021
Chyawanprash new batch ready.
।। च्यवनप्राश अवलेह ।।
च्यवनप्राश विषयी थोडे काही...
च्यवनप्राश जगप्रसिद्ध रसायन आहे असे म्हणायला हरकत नाही. ज्या आवळ्यापासून च्यवनप्राश तयार होतो, तो आवळाच मुळात सर्वोत्तम ‘रसायन’ असतो. अर्थातच त्यामुळे च्यवनप्राश नीट बनवला, सर्व घटक उत्तम प्रतीचे वापरून तयार केला, तर ते एक अप्रतिम ‘रसायन’ असते.(आधुनिक शास्त्रानुसार रसायन या शब्दाचा अर्थ chemicals असा होतो, परंतु आयुर्वेदानुसार रसायन म्हणजे ज्यामुळे शरीरात ओज immunity वाढते, व्यक्ती रोगमुक्त होतो, वृद्धावस्था लवकर येत नाही व दीर्घायुषी होतो, असा अर्थ होतो. )
च्यवनप्राश चे मुख्य घटक आवळा-
कार्तिक महिन्याच्या शेवटापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत जेव्हा आवळा आपल्या रस, वीर्याने परिपूर्ण झालेला असतो, तेव्हा झाडावरून हाताने तोडून गोळा करावा.
याठिकाणी लक्षात घ्यायची मुख्य गोष्ट म्हणजे झाडावर उत्तम पोसला गेलेला, रस-वीर्याने परिपूर्ण झालेला आवळाच औषधात वापरणे अपेक्षित असते. पूर्ण वाढ होण्यापूर्वीच झाडावरून गळून पडलेले आवळे वापरणे योग्य नाही. याशिवाय उत्तम कसदार जमिनीमध्ये तयार झालेला; गंध, रूप व चव उत्तम असलेला, पुरेसा रस असलेला आवळाच रसायन म्हणून वापरण्यास योग्य असतो, असे ग्रंथकार सांगतात.
वृष्यं रसायनं रुच्यं त्रिदोषघ्नं विशेषतः ।
वमनप्रमेहशोफपित्तास्रश्रमविबन्धाध्मानविष्टम्भघ्नम् ।। ..धन्वंतरी निघण्टु
आवळा शुक्रधातूला पोषक, रसायन गुणांनी परिपूर्ण असतो, रुची वाढविणारा असतो; त्रिदोषांचे संतुलन करण्यास समर्थ असतो, विशेषतः पित्तदोषाचे शमन करतो; ताप, दाह, उलटी, प्रमेह, शोथ, रक्तकपित्त, श्रम, मलावष्टंभ, पोटफुगी वगैरेंसाठी औषध म्हणून उपयुक्त असतो.
‘इदं वयःस्थापनानां श्रेष्ठम्’
असेही चरकसंहितेमध्ये म्हटलेले आहे. वय वाढले तरी त्यामुळे होणारी शरीराची झीज कमीत कमी प्रमाणात व्हावी किंवा तारुण्य टिकविणारे द्रव्य म्हणजे वयःस्थापन द्रव्य होय. आवळा हा नुसते वयःस्थापन करतो असे नाही, तर तो अशा प्रकारच्या द्रव्यात श्रेष्ठ, सर्वोत्तम समजला जातो, यावरूनच आवळ्याची महती लक्षात येते.
च्यवनप्राश तयार करताना पूर्ण तयार झालेला व रसरशीत आवळा वापरावा असे सांगितलेले असते. परंतु आजकाल बाजारात मिळणाऱ्या च्यवनप्राश मध्ये आवळ्यांसोबत कोहळे, रताळे यांची भेसळ करतात व इतर ही सांगितलेली औषधी द्रव्ये न टाकता कमी किमतीत विकतात. आणि अश्या प्रकारच्या च्यवनप्राश चा काहीही फायदा शरीराला होताना दिसत नाही.
चरक, शारंगधर बहुतेक संहितांमध्ये च्यवनप्राश अवलेह वर्णन केलेला आहे. च्यवनप्राश प्रभावी होण्यासाठी त्यात वापरलेली द्रव्ये तर उत्तम प्रतीची असावी लागतातच व बरोबरीने च्यवनप्राश बनविण्याची पद्धतही शास्त्रोक्ती असावी लागते. च्यवनप्राश अतिशय प्रसिद्ध असल्याने आजकाल अनेक जण तो बनवितात; पण त्यासाठी ग्रंथोक्तत योग्य पद्धत माहीत असणे व त्या पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा अनुभव गाठीशी असणे आवश्यक आहे.
च्यवनप्राश तयार करण्यासाठी आवळे तर मुख्य लागतातच; पण सुमारे चाळीस इतर रसायनद्रव्ये, रक्तशुद्धिकर द्रव्ये, त्रिदोषशामक द्रव्ये लागतात.
च्यवनप्राशची उपयुक्तेता आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याप्रकारे सांगितलेली आहे -
च्यवनप्राशः परमुक्तो रसायनः||६९||
कासश्वासहरश्चैव विशेषेणोपदिश्यते|
क्षीणक्षतानां वृद्धानां बालानांचाङ्गवर्धनः||७०||
स्वरक्षयमुरोरोगं हृद्रोगं वातशोणितम्|
पिपासां मूत्रशुक्रस्थान् दोषांश्चाप्यपकर्षति||७१||
अस्य मात्रांप्रयुञ्जीत योपरुन्ध्यान्न भोजनम्|
अस्य प्रयोगाच्च्यवनःसुवृद्धोऽभूत्पुनर्युवा||७२||
मेधां स्मृतिं कान्तिमनामयत्वमायुःप्रकर्षं बलमिन्द्रियाणाम्|
स्त्रीषु प्रहर्षं परमग्निवृद्धिं वर्णप्रसादंपवनानुलोम्यम्||७३||
रसायनस्यास्य नरः प्रयोगाल्लभेत जीर्णोऽपि कुटीप्रवेशात्|
जराकृतं रूपमपास्य सर्वं बिभर्ति रूपं नवयौवनस्य||७४||
(इति च्यवनप्राशः)| - चरक चिकित्सास्थान।
मेधा, स्मृती, आकलनशक्ती चांगली राहते; कांती, वर्ण, त्वचा उजळते, तेजस्विता येते; मन प्रसन्न राहते; हृद्रोग, खोकला, दमा, तृष्णा, वातरक्त, उरोग्रह, शुक्रदोष, मूत्रदोष, विविध वात-पित्त विकारांवर च्यवनप्राश उपयुक्त असतो. रसायन म्हणून सेवन केल्यास मनुष्य अकाली वृद्धत्वापासून, तसेच सर्व रोगांपासून दूर राहू शकतो.
च्यवनप्राश फक्त हिवाळ्यातच नाही तर संपूर्ण वर्षभर सेवन करता येतो. लहान मुलांनासुद्धा च्यवनप्राश देता येतो. पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना पाव चमचा, दहा वर्षांपर्यंत अर्धा चमचा आणि नंतर एक चमचा या प्रमाणात च्यवनप्राश घेता येतो. साधारण पस्तिशीनंतर याच च्यवनप्राशमध्ये रौप्य, सुवर्ण वगैरे द्रव्ये मिसळून केलेले संतुलन आत्मप्राश घेणे अधिक प्रभावी असते.
अजिबात साखर न टाकता बनविलेला किंवा चूर्ण स्वरूपातील च्यवनप्राश सध्या बाजारात मिळत असला तरी यातून च्यवनप्राशचे अपेक्षित असणारे सर्व फायदे मिळतीलच असे नाही. कारण च्यवनप्राश ही योजना आयुर्वेदाने प्राश म्हणून सांगितलेली आहे आणि ते रसायनही आहे, तेव्हा त्यात रस असणे आवश्यक आहे. तेव्हा संस्कार नीट करून बनविलेला शास्त्रशुद्ध च्यवनप्राश घरातील सर्वांनी वर्षभर सेवन करणे हे श्रेयस्कर होय.
दीर्घायु आयुर्वेद चिकित्सालय, नालवाडी, वर्धा. येथे आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. शास्त्रात वर्णन केलेल्या सर्व औषधी वनस्पती (ज्या सध्याच्या काळात उपलब्ध आहेत) त्यापासून च्यवनप्राश कुठल्याही प्रकारची भेसळ न करीता बनवितो. साखरेचे प्रमाण ही शास्त्रोक्तच असते. रुग्णांना व स्वस्थ व्यक्तींना या श्रेष्ठ रसायनाचा पूर्ण फायदा व्हावा हाच त्यामागचा हेतू🙏🏻.
डॉ. संकल्प रामराव हुमणे.
दीर्घायु आयुर्वेद चिकित्सालय,
दुर्गा माता मंदिर च्या बाजूला,
नागपूर रोड, नालवाडी, वर्धा.
9975452387.