22/05/2024
Case of the Week
हिंगोलीवरून एका फिजिशियन सर चा कॉल आला.
" सर, ४० वर्षाचा गृहस्थ आहे, महिन्या भरापासून तापाने त्रस्त आहे. आज माझ्याकडे आलेत दाखवायला, अंगावर सूज पण आहे, त्यांचा बीपी वाढून आहे, creatinine लेव्हल 1.5 आहे तसेच लघवी मधून प्रोटीन सुद्धा जात आहे. मला वाटत ह्याला तुमची गरज लागेल. मी त्यांना तुमच्याकडे पाठवत आहे."
XYZ, पुरुष, वय वर्षे 40, हिंदी भाषिक शेतकरी, आतापर्यंत निरोगी, कोणतेही व्यसन नाही. घरात कोणालाही जुनाट आजार नाही. महिन्याभरापासून तापाने त्रस्त, गावाकडील दवाखने करून झालेत पण काही फरक पडेना. मागील 8 दिवसापासून अंगावर सूज येणे सुरू झाले. हिंगोली मध्ये तपासण्या मध्ये बीपी वाढलेला, creatinine वाढलेलं, रक्ताशय (अनेमिया), पांढऱ्या पेशी वाढलेल्या तसेच लघवी मध्ये प्रोटीन आणि रक्त जात होत.
सहसा एका माणसाला एका वेळी एकच आजार असतो. वेग वेगळे त्रास किंवा लक्षण एकाच आजारा ने स्पष्ट झाले पाहिजेत.
मी विचार केला आणि ANA, C3 and C4 level करून घेतल. किडनी बायोप्सी सुद्धा करून घेतली.
आणि शेवटी निदान झाले. ANA ही तपासणी वाढून आली, C3, C4 level कमी. किडनी बायोप्सी मध्ये 'Diffuse Proliferative Glomerulonephritis with Full House pattern on IF' हे दिसून आलं.
Systemic Lupus Erythematous with Lupus Nephritis (SLE with LN) हे निदान पक्क झालं.
लांडग्या ला लॅटिन मध्ये Lupus म्हणतात. Erythematous म्हणजे लाल रंगाची पुरळ, जी या बिमारी मध्ये चेहऱ्यावर येते. ती लांडग्याने चेहऱ्यावर चावले तशी दिसते. त्यावरूनच या रोगाचं नाव पडल. हा रोग Autoimmune प्रकारात मोडतो. या मध्ये स्वतःची प्रतिकार शक्ती स्वतः चा शरिराविरूद्ध काम करते. ह्याची लक्षणं किरकोळ पासून(ताप,सांधेदुखी,चेहऱ्यावर अंगावर पुरळ) जीवघेण्या पर्यंत (किडनी, मेंदू, हृदय खराब होणे) घातक असतात.
हा रोग पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतो. (9:1 च्या प्रमाणात). हा रोग जवळपास शरिरातील सर्व अवयवांना ग्रासित करतो. याच निदान करण्यासाठी खालील पैकी 4 तरी लक्षण/तपासण्या ह्या पॉझिटिव असाव्या लागतात. (* ही लक्षण आपल्या पेशंट मध्ये होती )
1. Malar Rash (त्वचा)
2. Photosensitivity(त्वचा)
3. Discoid Rash(त्वचा)
4. Oral ulcers *( तोंडातील अल्सर)
5. Arthritis (सांधे)
6. Serositis (ह्रदय/फुफुस/लिव्हर)
7. Renal disorder*(किडनी)
8. Neurologic disorder(मेंदू)
9. Hematologic disorder*(रक्त/धमण्या)
10. ANA*
11. Immunologic Disorder*
ह्या रोगाचं निदान जेवढं कठीण असत तेवढाच उपचार हा किचकट असतो. उपचरादरम्यान गुंतागुंत(complications) निर्माण होऊ शकते. त्याने जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो. हा रोग रुग्णाची आणि डॉक्टर ची परीक्षाच घेत असतो. खासकरून ह्याचा उपचार डॉक्टरांसाठी आव्हानात्मक असतो.
तुम्ही लोकांपैकी कितिनी या आजराबद्दल ऐकलं होत ते comment मध्ये सांगा.
भेटूया पुढच्या लेखात.
डॉ. पंकज भगवानराव गोटे
एम. डी. मेडिसिन, डी.एन.बी नेफ्रोलॉजी
शकुंतला हॉस्पिटल, डॉक्टर लाईन पुसद नका, वाशिम
डॉ. प्रतिभा पंकज गोटे
स्त्री रोग, प्रसूती व वंध्यत्व तज्ञ
गोटे स्त्री रुग्णालय, काकडे हॉस्पिटल ,पुसद नाका, वाशिम