Family Doctor - Godawari Healthcare

Family Doctor - Godawari Healthcare this page is to bring that valuable information of ayurveda in fron of you. . get beauty, diet tips,

08/03/2023
https://chat.whatsapp.com/LBxBEwvUSFs0k2PrYWG8Bjचला घेऊया संकल्प नववर्षाचा - मधुमेहातून मुक्तीचा !! भाग १*मधुमेह उपचारां...
03/01/2022

https://chat.whatsapp.com/LBxBEwvUSFs0k2PrYWG8Bj

चला घेऊया संकल्प नववर्षाचा - मधुमेहातून मुक्तीचा !! भाग १

*मधुमेह उपचारांची त्रिसूत्री*

मधुमेह असाध्य असल्याचे समजले जाते. मात्र बऱ्याच प्रकरणात तो ‘कष्ट साध्य’ असल्याचे दिसते. अचूक निदान, मधुमेहाची अचूक वर्गवारी आणि त्या नुसार उपचार, तसेच १) आहार २) व्यायाम आणि ३) औषधोपचार या त्रिसूत्रीने मधुमेही रुगांना निश्चित लाभ झालेला दिसून येतो. चला तर या नववर्षात जाणून घेउया या त्रिसूत्री बाबत....

*आजचा विषय - मधुमेहातील आहार*

*पथ्य* – हे करू नये
अ) साखर गूळ बंद करावी. पण गोडाची आवड असेल, राहावत नसेल तर फार इच्छा होईल तेव्हा राळ बेदाणे, एखादा जर्दाळू खावा.
आ) तेल/तूप/मांस/लोणी/चीज टाळावे. मासे क्वचित गाईचे दूध चालेल.
इ) बेकरी/मैदा/फास्ट फूड/ तळलेले पदार्थ टाळावेत.
ई) भात बंद करावा. क्वचित हातसडीच्या तांदळाचा, भाजून केलेला भात चालेल. गव्हाच्या लापशी रव्याचा भात/खिचडी चालू शकेल.
उ) उपवास व उपवासाचे पदार्थ टाळावेत.
ऊ) दही टाळावे. पातळ ताक दिवसा घ्यावे. सायंकाळनंतर नाही.
ए) दारू, सिगरेट बंद करावे.
ऐ) वातूळ भाज्या/कडधान्ये टाळावीत.

*हे करू नये – हे करावे –*
अ) कर्बोदके कमी करून, प्रथिने अधिक घ्यावी.
आ) यकृताच्या कार्याच्या साहाय्यासाठी हिरव्या पालेभाज्या घ्याव्या.
इ) पालेभाज्यांप्रमाणेच वेलभाज्या, कोवळया शेंगभाज्या घ्याव्यात.
ई) भेंडी दोन्ही टोकांकडून कापून उभा छेद घ्यावा. रात्रभर पाण्यात राहू द्यावी. सकाळी भेंडी थोडी किवचून ते पाणी घ्यावे.
उ) रात्री गहू, मूग व मेथी वेगवेगळी पाण्यात भिजवावी. सकाळी ते पाणी एकत्र करून अर्धा चमचा लिंबूरस व मध टाकून प्यावे. गहू, मूग व मेथी मोडवून जेवणात घ्यावी.
ऊ) शहाळयाचे पाणी अवश्य घ्यावे.
ए) केळी, आंबा, चिकू, द्राक्षे ही वगळून इतर फळे घ्यावी.
ऐ) तुळस, बेल, कडुलिंबाची पाने+आले यांचा काढा घ्यावा.
ओ) घरी बनवलेला विडा रोज घ्यावा.
औ) पोळीऐवजी ज्वारी/नाचणी/जव यांची भाकरी शक्य तेव्हा घ्यावी.

हे सर्व उपाय रोजच व वर्षानुवर्षे करणे शक्य नाही त्याची गरजही नाही. पण ते आलटून-पालटून अवश्य करावेत, विशेषत: आहारातील पदार्थांबाबत हे करता येईल. त्याशिवाय रसाहार अवश्य घ्यावा. त्यामध्ये –

अ) फरसबीच्या शेंगांचा रस आठवडयातून तीन वेळा घ्यावा.
आ) इतर दिवशी कोबी/दुधी/भोपळा/पालक/टोमॅटो हे घ्यावे. इ) आवळा/कोथिंबीर/पुदिना यांचा वापर इतर रसांबरोबर करावा. सेव्हन कोर्स मील!
*मधुमेही व्यक्तींच्या या प्रकारच्या भोजनाचा तक्ता थोडा वेगळा असेल, पण तो हिताचा निश्चितच आहे*.
1) 1 वाटी हिरवी कोबी/पालक/मेंथी/लेटयुस/पुदिना/कोथिंबीर हे कच्चे किंवा वाफवून किंवा सूप करून घ्यावे.
2) 1 वाटी सॅलड (दह्याविना कोशिंबीर)
3) 1 वाटी डाळ, शक्यतो घट्ट.
4) 1 वाटी भाजी.
5) 1 वाटी मूग/मसूर/सफेद बीन्स/लहान चवळी/राजमा-उडीद यांची उसळ.
6) 1 भाकरी/दोन पोळया/ 1 ते दीड वाटी लापशीचा भात.
7) 1 वाटी फळे
वरीलपैकी पहिले दोन पदार्थ प्रथम घेणे आवश्यक आहे. तसेच फळे जेवणानंतर शेवटी घेणे श्रेयस्कर. बऱ्याच लोकांना जेवणानंतर काही गोड खाण्याची सवय किंवा आवड असते. त्या दृष्टीनेही फळे शेवटी खाणे बरे.

उद्याच्या लेखात जाणून घेऊया – व्यायामाबद्दल

*मधुमेही रुग्णांनी किंवा रक्तशर्करा अधिक असणाऱ्या रुगणांनी औषधे किंवा इन्सुलिन सुरु करण्या आधी एकदा अवश्य भेट द्यावी...*

*डॉ. अनुपम ढवळे*
B.A.M.S. (MUHS NASIK) M.D(AM) आयुर्वेद तज्ज्ञ
*गोदावरी हेल्थकेअर आयुर्वेद क्लिनिक*
C/o - डॉ. तारक चाईल्ड हॉस्पिटल, वीर वामनराव चौक यवतमाळ 445001.
Mob . – 7385016383

*सूचना – मधुमेही रुग्णांनी येण्यापूर्वी फोन करून वेळ घेणे आवश्यक*

WhatsApp Group Invite

चला घेऊया संकल्प नववर्षाचा - मधुमेहातून मुक्तीचा !! भाग १*मधुमेह उपचारांची त्रिसूत्री* मधुमेह असाध्य असल्याचे समजले जाते...
01/01/2022

चला घेऊया संकल्प नववर्षाचा - मधुमेहातून मुक्तीचा !! भाग १

*मधुमेह उपचारांची त्रिसूत्री*

मधुमेह असाध्य असल्याचे समजले जाते. मात्र बऱ्याच प्रकरणात तो ‘कष्ट साध्य’ असल्याचे दिसते. अचूक निदान, मधुमेहाची अचूक वर्गवारी आणि त्या नुसार उपचार, तसेच १) आहार २) व्यायाम आणि ३) औषधोपचार या त्रिसूत्रीने मधुमेही रुगांना निश्चित लाभ झालेला दिसून येतो. चला तर या नववर्षात जाणून घेउया या त्रिसूत्री बाबत....

*आजचा विषय - मधुमेहातील आहार*

*पथ्य* – हे करू नये
अ) साखर गूळ बंद करावी. पण गोडाची आवड असेल, राहावत नसेल तर फार इच्छा होईल तेव्हा राळ बेदाणे, एखादा जर्दाळू खावा.
आ) तेल/तूप/मांस/लोणी/चीज टाळावे. मासे क्वचित गाईचे दूध चालेल.
इ) बेकरी/मैदा/फास्ट फूड/ तळलेले पदार्थ टाळावेत.
ई) भात बंद करावा. क्वचित हातसडीच्या तांदळाचा, भाजून केलेला भात चालेल. गव्हाच्या लापशी रव्याचा भात/खिचडी चालू शकेल.
उ) उपवास व उपवासाचे पदार्थ टाळावेत.
ऊ) दही टाळावे. पातळ ताक दिवसा घ्यावे. सायंकाळनंतर नाही.
ए) दारू, सिगरेट बंद करावे.
ऐ) वातूळ भाज्या/कडधान्ये टाळावीत.

*हे करू नये – हे करावे –*
अ) कर्बोदके कमी करून, प्रथिने अधिक घ्यावी.
आ) यकृताच्या कार्याच्या साहाय्यासाठी हिरव्या पालेभाज्या घ्याव्या.
इ) पालेभाज्यांप्रमाणेच वेलभाज्या, कोवळया शेंगभाज्या घ्याव्यात.
ई) भेंडी दोन्ही टोकांकडून कापून उभा छेद घ्यावा. रात्रभर पाण्यात राहू द्यावी. सकाळी भेंडी थोडी किवचून ते पाणी घ्यावे.
उ) रात्री गहू, मूग व मेथी वेगवेगळी पाण्यात भिजवावी. सकाळी ते पाणी एकत्र करून अर्धा चमचा लिंबूरस व मध टाकून प्यावे. गहू, मूग व मेथी मोडवून जेवणात घ्यावी.
ऊ) शहाळयाचे पाणी अवश्य घ्यावे.
ए) केळी, आंबा, चिकू, द्राक्षे ही वगळून इतर फळे घ्यावी.
ऐ) तुळस, बेल, कडुलिंबाची पाने+आले यांचा काढा घ्यावा.
ओ) घरी बनवलेला विडा रोज घ्यावा.
औ) पोळीऐवजी ज्वारी/नाचणी/जव यांची भाकरी शक्य तेव्हा घ्यावी.

हे सर्व उपाय रोजच व वर्षानुवर्षे करणे शक्य नाही त्याची गरजही नाही. पण ते आलटून-पालटून अवश्य करावेत, विशेषत: आहारातील पदार्थांबाबत हे करता येईल. त्याशिवाय रसाहार अवश्य घ्यावा. त्यामध्ये –

अ) फरसबीच्या शेंगांचा रस आठवडयातून तीन वेळा घ्यावा.
आ) इतर दिवशी कोबी/दुधी/भोपळा/पालक/टोमॅटो हे घ्यावे. इ) आवळा/कोथिंबीर/पुदिना यांचा वापर इतर रसांबरोबर करावा. सेव्हन कोर्स मील!
*मधुमेही व्यक्तींच्या या प्रकारच्या भोजनाचा तक्ता थोडा वेगळा असेल, पण तो हिताचा निश्चितच आहे*.
1) 1 वाटी हिरवी कोबी/पालक/मेंथी/लेटयुस/पुदिना/कोथिंबीर हे कच्चे किंवा वाफवून किंवा सूप करून घ्यावे.
2) 1 वाटी सॅलड (दह्याविना कोशिंबीर)
3) 1 वाटी डाळ, शक्यतो घट्ट.
4) 1 वाटी भाजी.
5) 1 वाटी मूग/मसूर/सफेद बीन्स/लहान चवळी/राजमा-उडीद यांची उसळ.
6) 1 भाकरी/दोन पोळया/ 1 ते दीड वाटी लापशीचा भात.
7) 1 वाटी फळे
वरीलपैकी पहिले दोन पदार्थ प्रथम घेणे आवश्यक आहे. तसेच फळे जेवणानंतर शेवटी घेणे श्रेयस्कर. बऱ्याच लोकांना जेवणानंतर काही गोड खाण्याची सवय किंवा आवड असते. त्या दृष्टीनेही फळे शेवटी खाणे बरे.

उद्याच्या लेखात जाणून घेऊया – व्यायामाबद्दल

*मधुमेही रुग्णांनी किंवा रक्तशर्करा अधिक असणाऱ्या रुगणांनी औषधे किंवा इन्सुलिन सुरु करण्या आधी एकदा अवश्य भेट द्यावी...*

*डॉ. अनुपम ढवळे*
B.A.M.S. (MUHS NASIK) M.D(AM) आयुर्वेद तज्ज्ञ
*गोदावरी हेल्थकेअर आयुर्वेद क्लिनिक*
C/o - डॉ. तारक चाईल्ड हॉस्पिटल, वीर वामनराव चौक यवतमाळ 445001.
Mob . – 7385016383

*सूचना - बाहेरगावावरून येणाऱ्या रुगांनी येण्यापूर्वी फोन करून वेळ घेणे*

https://chat.whatsapp.com/LBxBEwvUSFs0k2PrYWG8Bj*कोविड ची तिसरी लाट आणि लहान मुलांसाठी काही मार्गदर्शक तत्वे*कोरोना संसर...
24/08/2021

https://chat.whatsapp.com/LBxBEwvUSFs0k2PrYWG8Bj

*कोविड ची तिसरी लाट आणि लहान मुलांसाठी काही मार्गदर्शक तत्वे*

कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर चला जाणून घेऊया बालकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काही उपाय….
मूलत: लहान मुलांची पचनशक्ती चांगली असते. त्यांनी खाद्यपदार्थ योग्य राखल्यास इतर सर्व सोपे असते. सध्याच्या सामाजिक रचनेमुळे बाहेरच्या तयार अन्नामुळे किंवा डबाबंद, पाकिटबंद अन्नसेवनामुळे मुलांची व्याधिक्षमता कमी होते. अशी मुले सहज आजारी पडतात. बालकांचे व्याधिक्षमत्व वाढविणे ही सामाजिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

1. बालकाची दिनचर्या नियमित असावी. सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपणे हा साधा नियम अगदी लहान बाळसुद्धा सध्या पाळू शकत नाही, याचे कारण आईवडिलांचे शेड्यूल.. त्यामुळे संध्याकाळच्या अयोग्य वेळेत बालक झोपते. हे म्हणजे साक्षात आजारालाच निमंत्रण आहे. बालकांच्या शरीराला व्याधिक्षम बनवायचे असेल तर पुरेशी व योग्य वेळेतील झोप ही पहिल्या क्रमांकावर आहे. वेळेवर झोपेने उत्तम भूक, बुद्धी व शरीरबल मिळते.

2. आहार - ऋतूनुसार बालकांचा आहार बदलावा. चॉकलेट किंवा तत्सम पदार्थांचे प्रमाण नियंत्रितच असावे. अतिफलाहार, अतिमांसाहार, तसेच कोणताही (अगदी दुधाचादेखील) अतिरेक टाळावाच. तळलेले पदार्थ वारंवार खाऊ नयेत. तळण घरचेच असावे. आहार गरम गरम द्यावा. आहार घेताना टीव्ही किंवा मोबाइल बंदच ठेवावा. जेवणासह कोमट पाणी पिण्याची सवय लावावी.

3. लहान मुलांना सकाळी उठल्याबरोबर मलविसर्जनाची सवय लावावी. जर दिनचर्या नियमित नसेल, तर दिवसभरातून एकदा तरी बालकाला मलवेग व्हायला हवा. एक दिवसाआड शौचाला होणे किंवा शौचाला खडा होणे घातक आहे. कंटाळा केल्याने किंवा खेळात व्यग्रतेने लहान मूल शौचाकडे दुर्लक्ष करते. अशा वेळेस एक-दोन ठरावीक वेळेस बालकांना त्याची सवय लावावी.

4. मुलांनी मैदानी खेळ खेळणे नक्कीच योग्य आहे. परंतु सध्याच्या स्थितीत हे कठीण दिसते आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या पुढील बालकांना व्यायामातील व योगासनातील धडे द्यावेत. सूर्यनमस्कार शिकवावेत. जागेच्या उपलब्धतेनुसार दोरीवरच्या उड्या मारणे, लपंडाव किंवा आंधळी कोशिंबीर यासारखे हालचाल व चपळता असणारे खेळ खेळावेत. योग्य काळजी घेऊन सायकल चालविणे, टेकडी चढणे असेसुद्धा नक्की करावे. व्यायामासह मनोरंजनास उपयोगी ठरणारे म्हणजे नृत्य होय. शास्त्रीय नृत्याचे धडे देणे किंवा अगदीच सलग 10-15 मिनिटे आईबाबांनी मुलांबरोबर आवडत्या गाण्यावर ठेका धरला, तर चांगला घाम येईपर्यंत हालचाली होतात. मोबाइल गेम्स नक्कीच आवर्जून टाळावेत.

5. नियमित अभ्यंग करणे हा एक शरीराची निकोप वाढ होण्यासाठी खूप मोठा उपचार आहे. गरम ऋतूत खोबरेल तेल वापरावे, तर थंड ऋतूत तिळाचे तेल बरे पडते. स्नानापूर्वी 10 मिनिटे तेल स्वत:चे स्वत: लावावे किंवा 10 मिनिटांत सर्व अंगाला पालकांनी लावून द्यावे. नंतर स्नान करताना साबणाचा अगदीच मर्यादित वापर करावा किंवा बेसनाचे वा मसुराचे पीठ उटणे म्हणून गरजेनुसार वापरावे. अभ्यंगामुळे त्वचेची ताकद वाढते. हवामानातील बदल लगेच आरोग्य बिघडवत नाहीत. लहान मुलांच्या अभ्यंगासाठी लाक्षादि तेल किंवा क्षीरबला तेलदेखील वापरता येतील. अभ्यंग करतानाच नाकातदेखील तेल लावावे.

6. 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना वेखंड व सोने उगाळून देणे हा एक उत्तम उपचार आहे. तसेच सर्वांनाच सुवर्णसिद्ध जलांचा वापरदेखील उपयोगी असतो.

7. सर्वांसाठीच घरात धुरी करणे उपयोगी आहे. विशेषत: बालकांसाठी हे उत्तम आहे. कडुनिंबाची वाळलेली पाने, धूप, राळ, तुळशीची पावडर, वेखंड, ओवा, लसूण टरफले यासारखी साधी औषधे धुपासाठी वापरावीत.


व्याधिक्षमत्व हे एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी सदैव प्रयत्नरत राहावे लागते. सर्वांनी आपल्या आपल्या आरोग्यासाठी जागरूक राहून व्याधी प्रतिकारशक्ती कमवावी. त्याने सर्वांनी आपले उत्तम आरोग्य राखावे.

*बालकांची प्रतिकारशक्ती आणि सुवर्णप्राशन*

सुवर्णप्राशन संस्कार हा आयुर्वेदातील १६ संस्कारांपैकी एक महत्त्वाचा असून, हा संस्कार ० ते १३ वर्ष वयोगटातील बालकांना करण्यात येतो.
सुवर्णप्राशन भस्म सुवर्णभस्म ,वाचा, गाईचे तूप इत्यादी पासून पुष्य नक्षत्रास बनवले जाते. हे गुणकारी औषध असून देण्याच्या प्रक्रियेला सुवर्णप्राशन संस्कार असे म्हणतात.
, कार वृद्धि वाढवणारे अग निवृत्ती कर अग्नि वृद्धी कर भूक वाढवणारे बल अधिकर, शक्तिदायक, दीर्घ आयुष्य देणारे कल्याणकारी सर्वांगीण विकास करणारे पुण्यकारक रोग प्रतिकारक्षमता वाढवणारे अक्षय कर ,शरीरातीलसप्त धातूंची वृद्धी करणार. वरण या कर सौंदर्य वृद्धी करणारे, ग्रह बाधा नाशक संक्रमणापासून रक्षण करणारे, तसेच सहा महिन्यापर्यंतसुवर्ण प्राशन केल्यास बाल सदर अर्थात एकदा ऐकलेले लक्षात ठेवणार होतो. अशा प्रकारे सुवर्णप्राशन केल्यामुळे बालकाची मानसिकशारीरिक व बौद्धिक वाढ होते. असे वर्णन आयुर्वेदामधे करण्यात आलेले आहे.

डॉ. अनुपम ढवळे
B.A.M.S. (MUHS NASIK) M.D(AM) आयुर्वेद तज्ज्ञ
@गोदावरी हेल्थकेअर आयुर्वेद क्लिनिक
C/o - डॉ. तारक लहान चाईल्ड हॉस्पिटल, वीर वामनराव चौक यवतमाळ 445001.
Mob . - 7385016383

*कृपया लेख आवडल्यास इतरांना फॉरवर्ड नक्की करा*

WhatsApp Group Invite

https://chat.whatsapp.com/L7TGnx3U5mbBE3hvR5tznN*वातरोग आणि आयुर्वेद प्रश्नोत्तरे - लाईव्ह वेबिनार*जाणून घ्या वातरोगांपा...
16/08/2021

https://chat.whatsapp.com/L7TGnx3U5mbBE3hvR5tznN

*वातरोग आणि आयुर्वेद प्रश्नोत्तरे - लाईव्ह वेबिनार*
जाणून घ्या वातरोगांपासून मुक्ती मिळवण्याचे कानमंत्र तसेच आपल्या प्रश्नांची उत्तरे आणि सविस्तर चर्चा...

विनामूल्य लाईव्ह वेबिनार. - आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अनुपम ढवळे B.A.M.S.M.D. (AM)
बुधवार दि. 18 ऑगस्ट संध्याकाळी ६.३० वाजता मराठी वेबिनारमध्ये सहभागी व्हा!
मर्यादित जागा !!
वेबिनारसाठी नावनोंदणी करण्याकरिता सोबत दिलेल्या लिंक वर क्लीक करून आमच्या WHATSAPP ग्रुप मध्ये सामील व्हा...
वेबिनार ची लिंक गृप वर १८ ऑगस्ट ला शेअर केली जाईल.

वेबिनार संबंधी अधिक माहिती साठी संपर्क
डॉ. अनुपम ढवळे
B.A.M.S. (MUHS NASIK) M.D(AM) आयुर्वेद तज्ज्ञ
@गोदावरी हेल्थकेअर आयुर्वेद क्लिनिक
C/o - डॉ. तारक लहान चाईल्ड हॉस्पिटल, वीर वामनराव चौक यवतमाळ 445001.
Mob . - 7385016383

WhatsApp Group Invite

https://chat.whatsapp.com/LBxBEwvUSFs0k2PrYWG8Bjआयुर्वेद आणि आहार - भाग 3*प्रकृती, आजार आणि आहार! *‘वात’, ‘पित्त’ आणि ‘क...
13/08/2021

https://chat.whatsapp.com/LBxBEwvUSFs0k2PrYWG8Bj

आयुर्वेद आणि आहार - भाग 3

*प्रकृती, आजार आणि आहार! *
‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे शब्द आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. पण हे नक्की काय असतं, त्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध, हे सर्वाना माहीत असायला हवं या दृष्टीने हा लेख


‘वात’, ‘पित्त’ आणि ‘कफ’ हे शब्द आयुर्वेदाच्या संदर्भात नेहमी ऐकलेले असतात. पण हे नक्की काय असतं, त्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध, हे सर्वाना माहीत नसतं. वात, पित्त आणि कफ हे तीन ‘दोष’ समजले जातात. दोषाधिक्यानं बनलेल्या ‘प्रकृती’ला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. प्रकृती आणि आहार या तर अगदी जवळच्या गोष्टी. आपल्या खाण्याच्या आवडीनिवडी जशा प्रकृतीवर अवलंबून असतात, तसंच काय खावं आणि काय टाळावं यातही प्रकृती-प्रकृतीमध्ये फरक असतो. काही पथ्यं पाळली तर प्रकृती बिघडल्यामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो.

जन्माला येतानाच आपण ज्या प्रकारची प्रकृती घेऊन येतो, ती आयुष्यभर बदलत नाही. माणसाची शरीरयष्टी, शारीरिक गुण, स्वभाव, आवडीनिवडी हे सगळं प्रकृतीवर अवलंबून असतं, असं आयुर्वेद मानतो. अर्थात तुमची प्रकृती वर दिलेल्या तीनपैकीच एक असली पाहिजे, असं नाही. काही जणांच्या बाबतीत ते दोषांचं मिश्रणदेखील असू शकतं. या लेखात मात्र आपण वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांची आयुर्वेदात सांगितलेली ढोबळ लक्षणं पाहू या. त्या त्या प्रकृतीच्या व्यक्तींना होऊ शकणारे त्रास आणि या त्रासांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी काय खावं आणि काय टाळावं हेही पाहू. एखादा पदार्थ एखाद्या व्यक्तीला चालतो, पण तोच पदार्थ खाल्ल्याने दुसऱ्याला मात्र त्रास होऊ शकतो अशी ही संकल्पना आहे. हे सगळं जाणून घेणं उत्सुकता वाढवणारं असलं तरी आपली स्वत:ची प्रकृती कुठली हे आपल्या वैद्यांकडून तपासून जाणून घेतलेलं बरं. कारण त्यानुसार आपल्याला चालणारे आणि न चालणारे पदार्थ वेगळे असू शकतील.
*पित्त प्रकृती*
‘पित्त’ प्रकृतीच्या व्यक्तींच्या त्वचेचा रंग सहसा गोरा आणि शरीरयष्टी मध्यम असते. त्यांची जीभ, टाळू, हाताचे तळवे, ओठ लालसर वर्णाचे असतात. केस पिंगट रंगाचे असतात आणि ते लवकर पिकतात. त्यांच्या त्वचेला सुरकुत्याही लवकर पडतात. ही मंडळी बुद्धीनं चांगली तीक्ष्ण असल्याचं बघायला मिळतं. यांना राग लवकर येतो. वारंवार भूक लागते आणि यांच्या आहाराचं प्रमाणही अधिक असतं. पित्त बिघडलं तर त्वचेवर लाल पुरळ येणं, फोड किंवा पस होणं, हातापायांचा दाह होणं, चक्कर येणं, भरपूर तहान लागणं, जेवायला अगदी १५-२० मिनिटांचा उशीर झाला तरी गळून गेल्यासारखं वाटणं अशा तक्रारी उद्भवतात.

*पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं? *
यांना अन्नात मधुर, कडू आणि तुरट रस चालेल. आंबट, खारट आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ मात्र यांनी प्रमाणातच खावेत. साजूक तूप, दूध, ताक, सरबतं, रसदार कोशिंबिरी (विशेषत: गाजर, काकडी इ.) गोड फळं, ताज्या रसदार भाज्या या व्यक्तींसाठी चांगल्या. पडवळाची भाजी यांच्यासाठी विशेष चांगली. रोजच्या जेवणातले पदार्थ बनवताना जिरे आणि धन्याची पूडही जरूर वापरावी. या लोकांनी आवळा जरूर खावा. आवळा चवीला आंबट असला तरी त्याचा विपाक मधुर असतो.

*काय टाळावं-*
यांना फार गरम अन्न चालत नाही. आहारात या व्यक्तींनी पापड, लोणची, आंबवलेले बेकरीचे पदार्थ, अतिमसालेदार पदार्थ टाळावेत. सिगारेट, अल्कोहोल, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन खरं तर सर्वानीच टाळलेलं चांगलं, पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना या गोष्टींचा त्रास लवकर होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या सवयी टाळाव्यातच.

*वात प्रकृती*
‘वात’ प्रकृतीच्या व्यक्तींची अंगयष्टी बारीक असते. त्यांचे केस, त्वचा, नखं रुक्ष असतात. त्यांना कमी झोप पुरते. या व्यक्ती सहसा बोलक्या असल्याचं दिसून येतं. नखं खाणं किंवा दात खाण्याची सवय त्यांना असते. यांना अन्न किंवा पेयं गरम आवडतात, गार यांना चालतच नाही. या व्यक्तींना बद्धकोष्ठाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. वात बिघडला किंवा चुकीचं काही खाण्यात आलं की वात प्रकृतीच्या व्यक्तींना त्वचा काळवंडणे, अंगदुखी, लवकर थकवा येणे, आवाज फाटणे किंवा चिरकणे, वजन कमी होणे असे त्रास होऊ शकतात.

*वात प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं? *
आहारात सहा रस मानले जातात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट हे ते रस. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर, आंबट आणि खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट, कडू आणि तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत. या लोकांनी कोकम सरबत जरूर आणि नियमित प्यावं. आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात अगदी नियमित वापरावं. तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियांची चटणीही यांच्यासाठी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो. कडधान्यांमध्ये या लोकांसाठी मूग चांगला.

*काय टाळावं-*
वात प्रकृतीच्या व्यक्तींनी अन्न शक्यतो गरमच खावं. थंड आणि शिळं अन्न टाळावं. यांनी उपवास टाळावा. चणे, राजमा अशी द्विदल धान्ये रुक्ष आणि वात वाढवणारी असतात. ती टाळली तर बरे.

*कफ प्रकृती*
‘कफ’ प्रकृतीच्या व्यक्ती भरदार शरीरयष्टीच्या असतात. यांची हाडं मजबूत असतात. शारीरिक कामाचा झपाटा आणि स्मरणशक्तीही उत्तम असल्याचं दिसतं. हे लोक सहसा धैर्यवान असतात, म्हणजे त्यांना भीती कमी वाटते. यांना थंड किंवा शिळं अन्न आवडत नाही. ताजं आणि गरमच जेवण लागतं. कफ बिघडला तर या व्यक्तींचं वजन वाढलेलं बघायला मिळतं. दम लागणं, कफ होणं, पटकन अपचन होणं, अंग जड होणं, काहीच करायची इच्छा न उरणं अशा तक्रारीही कफ बिघडल्यामुळं होऊ शकतात.

*कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी काय खावं? *
या व्यक्तींसाठी तुरट, कडू आणि तिखट रस असलेले अन्नपदार्थ चांगले. गोड, आंबट आणि खारट रसाचे पदार्थ मात्र यांनी कमीच खावेत. ज्वारी, नाचणी यांच्यासाठी चांगली. भाज्यांचे सूप उत्तमच. ते बनवताना हिंग, जिरे, मोहरी, लसूण यांचा वापर जरूर करावा. मसाल्याचे पदार्थ जरूर वापरावेत. यांनी पदार्थ तळण्यापेक्षा भाजून खाल्लेले बरे. आहारात जवसदेखील जरूर खावेत. जुने धान्य, जुना तांदूळ खावा.

*काय टाळावं-*
पचायला जड, स्निग्ध, तळलेले अन्नपदार्थ टाळावेत. बटाटा, रताळी यांसारखी पिष्टमय कंदमुळं टाळावीत. बटाटय़ाचे वेफर्स शक्यतो टाळलेलेच बरे. दही कमी खावे. कडधान्यात उडीद कमी खावेत. मिठाईही प्रमाणातच खावी. शिळे, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ नकोतच.

डॉ. अनुपम ढवळे
B.A.M.S. (MUHS NASIK) M.D(AM) आयुर्वेद तज्ज्ञ
@गोदावरी हेल्थकेअर आयुर्वेद क्लिनिक
C/o - डॉ. तारक लहान चाईल्ड हॉस्पिटल, वीर वामनराव चौक यवतमाळ 445001.
Mob . - 7385016383

*कृपया लेख आवडल्यास इतरांना फॉरवर्ड नक्की करा*

WhatsApp Group Invite

आयुर्वेद आणि योग शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणारे श्री गुरू बालाजी तांबे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे योग व...
10/08/2021

आयुर्वेद आणि योग शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणारे श्री गुरू बालाजी तांबे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे योग व आयुर्वेद क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीमत्व हरपले. भावपूर्ण श्रद्धांजली!

https://chat.whatsapp.com/LBxBEwvUSFs0k2PrYWG8Bj*आयुर्वेद आणि आहार - भाग २*मागील लेखात आपण आयुर्वेदीय आहार संकल्पना बघित...
08/08/2021

https://chat.whatsapp.com/LBxBEwvUSFs0k2PrYWG8Bj

*आयुर्वेद आणि आहार - भाग २*
मागील लेखात आपण आयुर्वेदीय आहार संकल्पना बघितली. आज विरुद्ध आहार किंवा विरुद्ध अन्न म्हणजे काय याची माहिती घेऊया ...

आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्रखायला नकोत. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार सगळ्या पदार्थांचा परिणाम शरीरावर वेगवेगळा होत असतो, त्यामुळे एखाद्याला झालेला त्रास आपल्याला होत नाही आणि आपल्याला झालेला त्रास सगळ्यांनाच होईल असे नाही. तरी सुद्धा जे अन्न आयुर्वेदाने विरूद्ध-अन्न सांगितले आहे, ते कोणीही एकत्र खाऊ नये. त्याचे दुष्परिणाम कळत – नकळत प्रत्येकाला भोगावे लागतात. पाहूया कि कोणते खाद्यपदार्थ विरुद्धान्न आहेत आणि ते एकत्र खाणे का टाळावे.

*१) दूध* : दुधात जे प्रोटीन असते ते प्राणिजन्य प्रथिने असतात. त्याबरोबर असे काही पदार्थ खाणे टाळावे ज्यामुळे त्वचेचे विकार आणि पोटाचे आजार होतात. दुधाबरोबर कधीही अंडे, मांस – मच्छी, कांदा, केळ, नमकीन फरसाण, आंबट फळे (लिंबू वर्गीय), मुळा, फणस, वांगी असे कोणतेही पदार्थ खाल्ल्याने ते एकमेकांना बिलकुल पचू देत नाहीत, दोघांनाही पचायला लागणारा वेळ वेगवेगळा असतो.
कांदा+दूध = त्वचारोग.
आंबट फळे+दूध = पोटाचे विकार.

*२) दही* : दुधाप्रमाणेच दह्याबरोबर सुद्धा फळे खाऊ नयेत, त्याने कफाचा उद्रेक होतो, कफ फुफ्फुसात जाऊन बसतो आणि infection चा धोका वाढतो. दही आणि उडीद एकत्र खाणे खुप घातक आहे, त्याने अचानक रक्तदाब वाढतो, हृदयविकार होतात. त्यामुळे दहिवडे खाणे आरोग्याला अतिशय घातक आहे.

*३) बीयर, कोल्ड्रिंक्स* : इत्यादी बरोबर नमकीन शेंगदाणे खूप लोक खात असतात, पण ही सवय तुम्हाला महागात पडू शकते, कारण बीयर, कोल्ड्रिंक्स पिल्यानंतर शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते, (dehydration) आणि त्यातच अजून खारट पदार्थ खाल्ले तर शरीरातील सोडियम झपाट्याने वाढते आणि पाणी पातळी अजूनच घटत जाते, ह्यामुळे चक्कर येणे, जीव घाबरणे, उलट्या होणे, घाम येणे अशी लक्षणं दिसून येतात.

*४) तूप* : सगळ्यात पौष्टिक समजले जाणारे तूप एरव्ही वरदान आहे, पण तूप हे तांब्याच्या भांड्यात कधीही ठेवू नये, त्यामुळे तूप विषारी होते, तसेच तूप आणि मध समप्रमाणात घेतल्यास विष तयार होते.

*५) जेवणामध्ये किंवा नंतर* लगेच अतिथंड किंवा अति गरम पेय घेऊ नये, यामध्ये, आईसक्रीम, कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी ह्याचा समावेश होतो.

वेगवेगळ्या हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंटमध्ये सतत विविध चवी देण्यासाठी, कशामध्ये काहीही एकत्र करून नवीन डिश बनवतात. ह्यामुळे आपल्या जिभेचे भरपूर लाड होतात, पण पोट आणि ईतर अनेक अवयवांना हे त्रास भोगावे लागतात. पुढच्या वेळी काही खातांना वरची लिस्ट चेक करायला विसरू नका, कारण आरोग्य चांगले असेल तरच बाकीचे आनंद आयुष्यात आपण उपभोगू शकतो.

डॉ. अनुपम ढवळे
B.A.M.S. (MUHS NASIK) M.D(AM) आयुर्वेद तज्ज्ञ
@गोदावरी हेल्थकेअर आयुर्वेद क्लिनिक
C/o - डॉ. तारक लहान चाईल्ड हॉस्पिटल, वीर वामनराव चौक यवतमाळ 445001.
Mob . - 7385016383
*कृपया लेख आवडल्यास इतरांना फॉरवर्ड नक्की करा*

WhatsApp Group Invite

https://chat.whatsapp.com/LBxBEwvUSFs0k2PrYWG8Bj*पावसाळ्यातील त्वचा विकार* - भाग २मागील लेखात आपण त्वचेच्या बुरशीमुळे हो...
04/08/2021

https://chat.whatsapp.com/LBxBEwvUSFs0k2PrYWG8Bj

*पावसाळ्यातील त्वचा विकार* - भाग २

मागील लेखात आपण त्वचेच्या बुरशीमुळे होणारे इन्फेक्शन म्हणजे Fungal infection बद्दल माहिती बघितली. आज आपण जीवाणू संक्रमण, विषाणू संक्रमण इ विषयी माहिती बघूया…
*1. जीवाणूचे संक्रमण/ Bacterial infection*
बुरशी जशी त्वचेचे दाह निर्माण करते तसेच त्वचेवर सामान्यरित्या आढळणारे अनेक जीवाणू आहेत ज्यांच्यामुळे आजार होऊ शकतात. दमट त्वाचेमुळे या जीवाणूंना आजार निर्माण करण्याची संधी मिळते. Folliculitis/ फॉलीक्यूलायटीस हा आजार Staphylococcus नावाचा जीवाणू निर्माण करतो. यात केसांच्या बिजकोशांवर सूज निर्माण होते व पू भरलेले फोड दिसयला लागतात. हा आजार जास्ती प्रमाणात केसाळ भागांमध्ये दिसतो. फोडांना अनेकदा कंड सुटू शकतो व वेदनाही होऊ शकतात. हाच आजार जर विकोपाला गेला तर गळू / furuncle निर्माण होतो आणि त्याही पुढे जाऊन कारबनकल/carbuncle निर्माण होऊ शकतो. या आजारामध्ये होणा-या वेदना अतिशय तीव्र असतात. डायबेटीक लोकांमध्ये हा आजार जास्ती आढळतो.

*2. विषाणूचे संक्रमण/ Viral infection* –
विषाणूंमुळे होणारे संक्रमण वेगळ्या पद्धतीने होतात. ते प्रत्यक्ष त्वचेवर होत नाहीत. शरीरात जर घश्याचं इन्फेक्शन किंवा विषाणूच्या संक्रमणामुळे ताप भरला असेल तर त्याचे प्रभाव किंवा लक्षणं rash/ पुरळ च्या माध्यमातून त्वचेवर उमटू शकतात. Pityriasis Rosea/ पिटीरीयासीस रोसिया असा एक आजार आहे ज्यात आधी घश्यात विषाणूनचं संक्रमण होतं आणि मग त्वचेवर त्याचे पडसाद दिसून येतात. या आजारामध्ये लाल गोल चट्टे उमटतात ज्यांना कंड सुटतो. संपूर्ण शरीरावर ते दिसू शकता. तसेच बारीक खाजवणारे फोडही निर्माण होऊ शकतात.
*3. घामोळे*
माझ्याकडे अनेक पेशंट्स तक्रार घेऊन येतात की पावसाळा सुरु झाल्या झाल्या शरीरावर विशेषतः पाठीवर खाज सुटते. नीट तपासलं तर घामोळे प्रामुख्याने आढळतात. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे घाम निर्माण करणा-या ग्रंथीचे तोंड बंद होऊ शकतं. ज्यामुळे घाम हा त्वचेच्या आतच साचतो आणि मग फुटतो. यात अतिशय बारीक पाणी भरलेले किंवा लाल फोड दिसतात आणि खाजून खाजून अनेकदा जळजळही होऊ शकते.
*4. इसब*
सतत त्वचा ओली राहिल्यामुळे त्वचेवरील Natural Moisturizing Factor (नाचरल मोईस्चराईजिंग तत्व/ एन.एम.एफ.) धुतलं जातं. त्वचा कोरडी पडू लागते. कोरड्या त्वचेला कंड सुटतो आणि मग इसब सारखे आजार दिसायला लागत. अनेकदा आपण पावसाच्या साठलेल्या घाण पाण्याला दोष देतो पण ढोबळमानाने घाण पाणी असो किंवा स्वच्छ पाणी असो हा त्रास होऊच शकतो.
*5. किटक चावल्यामुळे*
साठलेल्या पाण्यामुळे डोक्याला होणारा सर्वात मोठा व्याप म्हणजे डास! डासांचे थारोळेच्या थारोळे दिसू लागतात. आपल्या यवतमाळात तर डासांमुळे होणा-या आजारांचं प्रमाण जरा जास्तीच आहे. एकतर डासांनी चावल्याने papular urticaria/ पापुलर अरटीकेरिया होतो. या आजाराला एका प्रकारचे त्वचेवरचे पित्त म्हणता येईल. सहसा डास चावल्यावर त्या जागी छोटी लाल गांधी उठते ज्याला कंड सुटतो.
एरवी ती गांधी ३ ते ४ तासात नाहीशी होते परंतु papular urticaria मध्ये ती तशीच राहते. त्याला कायम खाज सुटत राहते आणि त्या जागी जखमसुद्धा होऊ शकते. तसच डासांमुळे होणारा dengue या आजारात ताप व अंगदुखी असतेच पण त्याच बरोबर रक्तातील platelet नावाची पेशी जी रक्तस्राव थांबवते तीची संख्या खूप कमी होते. त्यामुळे त्वचेत रक्तस्राव होऊन त्वचेवर नीळसर काळे चपटे डाग निर्माण होऊ शकतात.
खरुज सारखे आजारही दिसून येतात. ज्यात बोटांपाशी, बेंबीपाशी, गुप्तांगावर छोटे पुरळ निर्माण होतात. हा आजार होतो sarcoptes scabiei नावाच्या किटकामुळे. कुटुंबातील एकाला जरी हा आजार झाला तर तो कुटुंबामधल्या इतर लोकांमध्ये हमखास पसरू शकतो.

*प्रतिबंधात्मक उपाय*
१. भिजलेले कपडे लवकरात लवकर वेळ मिळाल्यावर बदलावे
२. ओलसर/ दमट कपडे घालणे कटाक्षाने टाळावे. शक्य झाल्यास ते इस्त्री करून वापरावे.
३. Undergarments/ अंतर्वस्त्रे किमान २ वेळा बदलावे.
४. जिन्ससारखे घट्ट चिटकून बसणारे आणि लवकर न वाळणारे कपडे घालणं टाळावे.
५. ऑफिसला जाताना जमल्यास पूर्ण बंद असलेले rubber चे बूट वापरावे विशेषतः जर पायांना जख्मा असतील तर floaters/ चप्पलांचा वापर टाळावा. ऑफिसमध्ये बुटांचा जास्तीचा जोड ठेवावा म्हणजे ओल्या बुटांमुळे होणारे टीनिया पेडीस व चिखल्यांसारखे आजार टाळता येतील.
६. कडक पाण्यानी आंघोळ करणं टाळावे कारण ओलसरपणामुळे आधीच कमी झालेल्या Moisturizing Factor (नाचरल मोईस्चराईजिंग तत्व/ एन.एम.एफ.) ची परत अजून कमी होऊन इसब निर्माण होऊ शकतो.
७. फक्त सौम्य साबणाने आंघोळ करावी. कोणत्याही पुतिनाशक/ antiseptic साबण वापरण्याची गरज नसते. साबण मुळातच जीवाणू व विषाणू मारण्यात समर्थ असतो.
८. डासांपासून स्वतःचा बचाव करणे अत्यंत महत्वाचे आहे. “आमच्याकडे डास नाहीत” असं मला अनेक पेशंट्स सांगतात. त्यावर मी त्यांना एवढंच सांगतो की 10 नाही तर १ डास सुद्धा पुरतो आजार निर्मितीसाठी! म्हणूनच लांब बाह्यांचे कपडे व फुल pant घालणे कधीही लाभदायी ठरते. आणि अजूनतरी भारत सारख्या देशात एकही डास नाही असा विधान करणं जरा विचित्रच नाही का?
९. ज्या लोकांना diabetes/डायबेटीस चा त्रास आहे त्यांनी रक्तातील साखरेच्या प्रमाणात नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. म्हणून वेळच्या वेळी रक्ताचे तपास करून घेणे आवश्यक आहे.

डॉ. अनुपम ढवळे
B.A.M.S. (MUHS NASIK) M.D(AM) आयुर्वेद तज्ज्ञ
@गोदावरी हेल्थकेअर आयुर्वेद क्लिनिक
C/o - डॉ. तारक लहान चाईल्ड हॉस्पिटल, वीर वामनराव चौक यवतमाळ 445001.
Mob . - 7385016383

WhatsApp Group Invite

https://chat.whatsapp.com/LBxBEwvUSFs0k2PrYWG8Bj*पावसाळ्यातील त्वचा विकार* - भाग १येरे येरे पावसा! तुला देतो पैसा! पैसा ...
03/08/2021

https://chat.whatsapp.com/LBxBEwvUSFs0k2PrYWG8Bj

*पावसाळ्यातील त्वचा विकार* - भाग १

येरे येरे पावसा! तुला देतो पैसा! पैसा झाला खोटा… पाऊस आला मोठा !!
या वर्षी मात्र पैसा न देताच पाऊस आला! आणि तोही लवकर आला ! कडक उन आणि दुष्काळापासून आपल्या सर्वांना वाचवायला! पण त्याच बरोबर अनेक रोग बरोबर घेऊन आला. उन्हाळ्यातील कोरोना पासून आपण सावरत होतोच की पावसाळ्यातील नवीन रोग सुरु झाले! यंदा बरेच लोक या पावसाळी त्वचाविकारांची तक्रार घेऊन भेटायला आले. म्हणूनच तुम्हा सर्वांना पावसाळ्यातील आजारांविषयी माहिती देण्यासाठी हा ब्लॉग लिहित आहे.

*पावसाळ्यात होणा-या आजारांचे सर्वसाधारण गट असे आहेत*
१. त्वचेच्या बुरशीमुळे इन्फेक्शन/ Fungal infection
२. जीवाणूचे संक्रमण/ Bacterial infection
३. विषाणूचे संक्रमण/ Viral infection
४. घामोळे
५. इसब
६. किटक चावल्यामुळे होणारे त्वचा रोग
७. उंदरामुळे होणारे आजार

पैकी आज आपण त्वचेच्या बुरशीमुळे होणारे इन्फेक्शन म्हणजे Fungal infection बद्दल माहिती बघूया
*अ. टिनिया इन्फेक्शन/ Tinea infection*
त्वचेवरची ही लागण पावसाळ्यात सर्वात जास्तं दिसते. टिनिया इन्फेक्शन ला सर्वसामान्य भाषेत नायटा, गजकरण किंवा दाद या नावाने ओळखलं जातं. उन्हाळ्यात होणारा आजार पावसाळ्यात उफाळून येतो याचं प्रमुख कारण म्हणजे हवेतील आर्द्रता वाढते जेणेकरून घाम जास्ती सुटतो. शिवाय पावसाच्या पाण्यात भिजूनसुद्धा त्वचा ओलसर राहते. अशावेळी त्वचेवरच्या बुरशीला वाढीसाठी पोषक वातावरण मिळतं आणि मग खाज व लाल गोल रिंगच्या आकाराचे चट्टे दिसायला लागतात. लाल चट्टे मुख्यतः जांघेत, ओटीपोटावर, काखेत, स्तन ग्रंथी ई ठिकाणी दिसतात. या आजाराला वैद्यकीय भाषेत शरीरावर आढळल्यास टिनिया कॉर्पोरीस व शरीरावरच्या घड्यामध्ये आढळल्यास टीनिया क्रुरीस असं म्हटलं जातं. हाच आजार जर हातावर झाला तर त्याला टीनिया मानम म्हणतात आणि पायावर झाला तर टीनिया पेडीस/ अथलिट्स फुट असं म्हणतात.
*ब. शिब्लं/ सुरमा/ पीटीरीयासीस वर्सिकलर*
हा आजार सुद्धा त्वचेच्या बुरशीमुळेच होतो. शरीरावर पांढरटसर किंवा काळे चट्टे दिसू लागतात. छातीवर, पाठीवर व मानेवर हे चट्टे दिसतात. हे चट्टे नखाने खुरडल्यावर पांढरट भुसा निर्माण होतो. या आजारात खाज सुटत नाही आणि लोक प्रामुख्याने हा आजार दिसायला बरा दिसत नाही म्हणून उपचार करून घेतात.
*क. कॅन्डिडीयासीस/Candidiasis*
शरीरावरच्या घड्यांमध्ये हा आजार आढळतो. साहजिक आहे की घड्यांमध्ये घाम जास्त सुटतो. या भागांमध्ये घर्षणाचं प्रमाणही जास्तीच असतं. पावसाळ्यात त्वचा दमट राहिल्यामुळे हा आजार निर्माण करणा-या बुरशीला वाढायला वाव मिळतो. मग जांघेतला, काखेतला लालपणा आणि खाज वाढते. अनेकदा खाजून खाजून जखमाही होऊ शकतात. तसेच जर ती जागा अस्वच्छ असली तर, खाजवून पू भारलेल फोड पण निर्माण होऊ शकतात. पायांच्या किंवा हातांच्या बोटांमध्ये जेव्हा ही बुरशी वाढते तेव्हा आपण चिखल्या झाल्या आहेत असं म्हणतो. बोटांमध्ये खोलगट आणि पांढरटसर खड्डा निर्माण होतो, ज्यात कंड सुटू शकतो व कधी कधी वेदनाही होऊ शकतात. पुरुषांमध्ये शिश्नमुंडाचा व त्याच्या टोकाचा दाह जो होतो त्याचं मुख्य कारण कॅन्डीडीयासिस आहे. डायबेटीसच्या आजाराशी कॅन्डीडीयासीसचं इतकं घट्ट नातं आहे की ज्या लोकांना हा त्रास सतत होत राहतो त्या लोकांचं रक्त तपासलं तर हमखास डायबेटीसचं निदान होतं.

*उपाययोजना*

> काही सोपी मात्र उपयुक्त उपाययोजना पावसाळ्याच्या दिवसांत हमखास करता येते. ही पथ्ये नियमित पाळली तर बुरशीमुळे होणारे इन्फेक्शन बर होण्यास मदत होते.

> सोबत संपूर्ण कोरड्या झालेल्या कपड्यांची एक जोड ठेवून द्या. पावसातून गेल्यानंतर काम संपल्यानंतर लगेच स्वच्छ होऊन कोरडे कपडे घाला. त्यानंतर दमट कपड्यात फार वेळ राहावे लागणार नाही.

> टीव्हीत दाखविलेली औषधे परस्पर वापरू नयेत, प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते, त्यातून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.

> ओल्या चपला वापरल्याने पायांच्या बोटांमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका वाढतो. पावसाळी चपला वापरल्यास त्या पुसून कोरड्या करता येतात.

> बूट वापरण्यापेक्षा चपला वापरणे सोयीचे असते. बंद बुटाच्या दमटपणात पाय कोंडतात. पाय कोरडे असणे हे त्वचारोग टाळण्याचा सोपा उपाय.

> सॉक्स किंवा बूट घालावा लागल्यास पायाला दमट घाम येतो, अशा वेळी क्लोट्रायमाझोल पावडर घालावी, त्यामुळे घाम आणि धुळीला अटकाव होतो.

> बाहेरून आल्यावर त्वचेच्या फटीमध्ये भेगात लपलेले जंतू निघून जाण्यासाठी आंघोळ करावी

> डायबेटिस नसेल तर पाय स्वच्छ घासून कोमट पाण्यात ठेवावे, त्यामुळे त्वचा निर्जंतुक होते.

> अंगाला घट्ट चिकटून बसणारे कपडे घालू नयेत, मोकळे कपडे घातल्याने त्वचा कोरडी राहते

> हातापायाची नखे कापावीत, त्यात माती अडकल्याने जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.

*क्रमशः*
डॉ. अनुपम ढवळे
B.A.M.S. (MUHS NASIK) M.D(AM) आयुर्वेद तज्ज्ञ
@गोदावरी हेल्थकेअर आयुर्वेद क्लिनिक
C/o - डॉ. तारक लहान चाईल्ड हॉस्पिटल, वीर वामनराव चौक यवतमाळ 445001.
Mob . - 7385016383

WhatsApp Group Invite

https://youtu.be/1l4yIRTvwOc*ऑनलाइन एक्यूप्रेशर & कलर थेरेपी कोर्स / Online Acupressure & Color Therapy Course  - जुलाई ...
12/07/2021

https://youtu.be/1l4yIRTvwOc

*ऑनलाइन एक्यूप्रेशर & कलर थेरेपी कोर्स / Online Acupressure & Color Therapy Course - जुलाई बैच*

*फ्री डेमो लेक्चर के साथ*

*डेमो के बाद प्रशिक्षण शुल्क* - मात्र 2100

*जुलाई बैच* - 21 जुलाई से शुरू।
*रजिस्ट्रेशन की अंतिम तारीख* - 15 जुलाई

रजिस्टर करने के लिए व्हाट्स एप नंबर

डॉ. अनुपम ढवले /Dr. Anupam Dhawale

07385016383

कोर्स की संपूर्ण जानकारी ऊपर लिंक में दिए गए वीडियो में विस्तार से बताई गई है। कृपया वीडियो को पूरा जरूर देखे।

*फ्री डेमो क्लास*- अगर आप पहले 4 डेमो लेक्चर लेना चाहते है तो टाइप करें
ACCU DEMO (अपना नाम )

और व्हाट्स व्हाट्स एप करे

डॉ. अनुपम ढवले
7385016383

ऑनलाइन एक्यूप्रेशर & कलर थेरेपी कोर्स / Online Acupressure & Color Therapy Courseप्रशिक्षक - डाॅ. अनुपम ढवले , B.A.M.S. MD (AM) Reiki Grandmaster U.S.A. , ...

Address

DARDA NAGAR
Yavatmal
445001

Telephone

07385016383

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Family Doctor - Godawari Healthcare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Family Doctor - Godawari Healthcare:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category