05/02/2024
आई, माझ्या मित्राला girlfriend आहे.. पण मला नाहीए.
काल माझ्या सात वर्षाच्या मुलाशी गप्पा मारत होते. विषय त्याच्या आवडीचा होता. शाळेमध्ये काय चालू आहे, कोणाच्या कश्या खोड्या काढणं असत, खाऊ म्हणून कोण काय काय आणत वगैरे .. हे झाल्यावरती, मी त्याला सहजच विचारलं कि तुला कोणी “ Girl friend” आहे का रे?
माझ्या ह्या प्रश्नावरती घरातल्या आज्जी आजोबांचे चेहेरे म्हणजे “ हि हिच्या लहान मुलाशी काहीही बोलते. “ असे काहीसे होते. पण माझ्या मुलानी हा प्रश्न अगदीच casual घेतला आणि भरभरून बोलायला लागला.
“ नाही ग आई, मला नाहीए girlfriend. पण माझ्या क्लास मधल्या गगग मुलाला आहे. तो तर हिरोच आहे. त्याच्या मागे तर तीन क्लास मधल्या सगळ्या मुली आहेत पण त्याच्या favourite दोन आहेत. हे तर काहीच नाही, आमच्या long break मध्ये आम्हाला तिकीट दिलेली बबब आणि मम म नि. त्यांनी झाडाची वाळलेली पान गोळा केली होती एका circle मध्ये आणि मग तिथे एकमेकांना किस केलं आणि आम्हाला clap करायला सांगितलं.” हे सगळं तो अगदी नीट सांगत होता.
आता, त्याच्या ह्या वाक्यांवरती माझा रिप्लाय अत्यंत महत्वाचा होता.
एक पालक म्हणून माझ्या मनात सुद्धा अनेक शंका येत होत्या, पण अश्यावेळेस मी माझ्यातली आई कमी आणि counselor जास्ती अशी भूमिका घेते. मी त्याला आता थांबवलं , वेडेवाकडे चेहेरे केले , असं नाही तसं नाही म्हंटल असतं तर त्यांनी त्याला पुढे अजून जे काही सांगायचं असेल तर ते पण थांबवलं असत, त्यामुळे मी सुद्धा त्याच्या conversation मध्ये मला काही त्रास वगैरे होत नाहीए अश्या भावनेने सहभागी झाले. घरातल्या इतर व्यक्तींनाही ( विशेषतः आज्जी आजोबांना) आधीच समजून सांगितलं होतं.
दुसरी- तिसरी मध्ये लहान मुलं तुम्हाला अश्या विषयांबद्दल सांगायला येत असतील तर त्यांना रिऍक्ट न करता रिप्लाय देयला हवा. प्रेम म्हणजे काय असत? मुलगा आणि मुलगी एकमेकांना मिठी मारतात, पापी देतात, हातात हात घालून नाचतात, मुलगा मुलीला उचलून घेतो वगैरे गोष्टी मुलांना ह्या वयात समजत असतात, त्याबद्द्दल त्यांचे त्यांच्यापरीने विचार सुद्धा होत असतात, आणि काहीवेळेस त्यांना तसं करावंसं सुद्धा वाटतं असत. ह्या सगळ्यामध्ये पालकांना हमखास पडणारा प्रश्न म्हणजे, “ आम्ही तर नाही काही दाखवलं ह्याला तसलं काही… मग कुठून बरं शिकला?” तर, तुम्हीच किंवा इतर कोणी ह्या गोष्टी शिकवायला लागतातच असं नाही.
सिनेमा मधून, लहान मुलांच्या काही कार्टून्स मधून सुद्धा मुलं ह्या गोष्टी पाहत असतात.
मामाचं लग्न मुलीशीच का झालं? किंवा माझी आत्या आता लग्न झाल्यामुळे आपलं घर सोडून त्या काकाच्या बरोबर का राहते? मग, अचानक एक दिवस तिचं पोट मोठं होऊन त्यातून एक बाळ कसं आलं? वगैरे प्रश्न मुलांना पडत असतात. सगळेच पालक त्यांचं समाधान करताच असं नाही. काही वेळेस मुलं सुद्धा असे प्रश्न पालकांना विचारत नाहीत आणि म्हणून त्याची उत्तर त्यांना दिली जात नाहीत.
मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढ होत असताना ह्या गोष्टींबद्दल त्यांना curiosity वाटणं साहजिक आहे. तसंच, gadgets चा वापर सहज असल्यामुळे ह्या गोष्टी लपून राहणं सुद्धा अवघड आहे. ह्यामध्ये, आजूबाजूच्या वातावरणाचा म्हणजेच ( सामाजिक ) factor पण महत्वाचा आहे.
भारताबाहेरच्या बाहेरच्या देशामध्ये kissing openly केलं जातं. त्यामुळे, अगदी पहिली मधली मुलं सुद्धा, तू माझा boyfriend आहेस वगैरे बोलताना दिसतात. माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार, ह्याला पालक सुद्धा जबाबदार आहेत, कारण , मुलं असं बोलत असताना पालक त्यांना समजावताना दिसतातच असं नाही.
मुलांची शारीरिक, भावनिक, मानसिक वाढ होत असताना, त्यांच्या हार्मोन्स मध्ये होत असलेला बदल, त्यांना वाटणारं आकर्षण, कुतूहल ह्या मुळे सुद्धा मुलं लवकर ह्या विषयांबद्दल बोलताना दिसतात. कुठेतरी, peerpresure सुद्धा कारणीभूत असतं. ह्यामध्ये शरीरात असणारा मूलभूत फरक, private parts बद्दल वाटणारं कुतुहल, एखादा किंवा एखादी छान वाटणं, जोक्स सांगणं, science किंवा history च्या पुस्तकात असलेल्या आदिमानव , सांगाडे वगैरे आकृतीकडे फिसफिस हसून पाहणं वगैरे गोष्टी येतात.
ह्या सगळ्यामध्ये पालकांची भूमिका कशी असायला हवी?
१. तुमच्या मुलांनी तुम्हाला त्यांच्या शाळेतल्या अश्या गोष्टी घरी येऊन सांगायला हव्या असतील तर, त्यांचं पूर्ण ऐकून न घेता प्रश्नाचा भडीमार करून नका. त्यामुळे तुमची मुलं पुढचं काही सांगायच्या आधी बिचकतील.
२. मुलाला, मुलीला सेक्स education वयानुसार द्या. तुम्हाला त्याबद्दल माहिती नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
३. मुलं प्रश्न विचारत असतील, (awkward ) तर त्यांच्या वयानुसार शंकेचं निरसन करून, परत कधीतरी बोलू, किंवा तू अमुक एका वयाचा झालास कि सांगेन असं उत्तर देऊ शकता.
४. काही वेळेस, माझ्या मित्राला मुली भाव देतात, मला नाही, ह्या विचारामुळे मुलाची चिडचिड होत असेल, त्रागा होत असेल, आणि त्याचा परिणाम त्याच्या इतर कामांवर , अभ्यासावर होत असेल तर counseling करणं फायद्याचं ठरेल.
५. पालक आणि मुलं ह्यांच्यातला bond घट्ट ठेवा. मुलांना तुमच्याशी मनमोकळं बोलावसं वाटायला हवं, ह्यासाठी पालकांनी actively प्रयत्न करायला हवेत. म्हणून मुलांचे सतत लाड करा असं नाही किंवा त्यांचं हवं ते सहन करा असाही नाही.
6. मुलं वापरत असलेले शब्द , त्याचा अर्थ ह्याचा ताळमेळ लागतोय का ते सुद्धा तपासून पहा. खूपदा, सांगायचं काहीतरी वेगळं असतं आणि मुलं शब्द भलतेच वापरतात. मग अश्यावेळेस, आपलं confusion होण्याची शक्यता असते.
७. मुलं कोणाबरोबर आहेत , त्यांची संगत कशी आहे, अजिबाजुच वातावरण कसं आहे हे सुद्धा तपासून पहा. त्यामध्ये, काही बदल करणं गरजेचं असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न करा.
मुलं मोठी होई पर्यंत त्यांची भावनिक , शारीरिक आणि मानसिक काळजी पालकांनी नीट घेतली तर तुमची मुलं तुमच्याशी मनमोकळे पणे संवाद साधतील.
Happy Parenting !!
ऋता भिडे
Child counselor, Parenting advisor for special needs children and neurotypical children.